MS dhoni IPL 2023 : जबरदस्ती मागे लागला, मनात नसताना धोनीला सहकाऱ्याच्या टी-शर्टवर द्यावी लागली ऑटोग्राफ, VIDEO

MS dhoni IPL 2023 : चेन्नईने काल विजेतेपद मिळवल्यानंतर मैदानातील एमएस धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमधून धोनीला स्वत:च मोठेपण मिरवणं आवडत नाही, हेच कळून येतय.

MS dhoni IPL 2023 : जबरदस्ती मागे लागला, मनात नसताना धोनीला सहकाऱ्याच्या टी-शर्टवर द्यावी लागली ऑटोग्राफ, VIDEO
MS Dhoni
| Updated on: May 30, 2023 | 1:21 PM

अहमदाबाद : चेन्नई सुपर किंग्सने गुजरातला हरवून IPL 2023 ची ट्रॉफी जिंकली. चेन्नईच हे पाचव विजेतेपद असून त्यांनी सर्वाधिक वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सशी बरोबरी केली आहे. चेन्नईने काल विजेतेपद मिळवल्यानंतर मैदानातील एमएस धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमधून धोनीला स्वत:च मोठेपण मिरवणं आवडत नाही, हेच कळून येतय. चेन्नई सुपर किंग्सने काल पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली, त्याच सर्वाधिक श्रेय धोनीच आहे.

एमएस धोनीने काही दिवसांपूर्वी भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या शर्टावर स्वाक्षरी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. चेन्नई सुपर किंग्सच्या एका प्लेयरने काल मॅच जिंकल्यानंतर धोनीकडे अशीच मागणी केली.

तो प्लेयर धोनीच्या मागे लागलेला

धोनीकडे टी-शर्टवर स्वाक्षरी करण्याची मागणी करणाऱ्या प्लेयरच नाव आहे, दीपक चाहर. तो टी-शर्टवर स्वाक्षरी मिळवण्यासाठी धोनीच्या मागे लागला होता. पण धोनीला हे पटत नव्हतं, म्हणून तो त्याला नकार देत होता. मॅच जिंकल्यानंतर चाहर पेन घेऊन धोनीजवळ गेला. त्यावेळी धोनी राजीव शुक्ला यांच्याबरोबर बोलत होता.

राजीव शुक्ला हसले

चाहरला त्याच्या टी-शर्टवर धोनीची सही हवी होती. चाहर धोनीजवळ जाताच, धोनी त्याला तिथून निघून जाण्याचा इशारा करत होता. चाहरने धोनीचा हात पकडला. धोनीने कसाबसा आपला हात त्याच्याकडून सोडवून घेतला. धोनी चाहरकडे इशारा करुन राजीव शुक्लासोबत काहीतरी बोलत होता. त्यावेळी राजीव शुक्ला चाहरकडे पाहून हसत होते.


ते धोनीला आवडलं नव्हतं?

दीपक चाहर खूपच मागे लागल्यानने धोनी अखेर राजी झाला व त्याने टी-शर्टवर स्वाक्षरी केली. सोशल मीडियावर या दोघांचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय. चाहर मजा-मस्करीच्या मूडमध्ये होता. पण धोनीच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. दीपक चाहर जे वागत होता, ते धोनीला आवडलं नव्हतं, असं धोनीच्या चेहऱ्यावरुन दिसत होता.