AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICC World Cup 2023 Schedule Announcement | शेड्युल जाहीर झाल्यामुळे नाराज पाकिस्तान भारतात येणार नाही?

ICC World Cup 2023 Schedule Announcement | वर्ल्ड कप 2023 साठी आज शेड्युल जाहीर झालं. पाकिस्तानची एकही मागणी मान्य केलेली नाही. त्यामुळे पाकिस्तान भारतात येण्याआधी अजून नाटकं करु शकतो.

ICC World Cup 2023 Schedule Announcement | शेड्युल जाहीर झाल्यामुळे नाराज पाकिस्तान भारतात येणार नाही?
world cup 2023 pakistan team
| Updated on: Jun 27, 2023 | 3:44 PM
Share

मुंबई : आयसीसी वर्ल्ड कप 2023 साठी शेड्युल जाहीर झालय. या शेड्युल नंतर फक्त एका टीमचा भ्रमनिरास झाला असेल, ती टीम म्हणजे पाकिस्तान. कारण ड्राफ्ट शेड्युल आल्यानंतर पाकिस्तानने बऱ्याच मागण्या केल्या होत्या. पण त्यांची एकही मागणी मान्य झाली नाही. उलट आधी ठरलं होतं, तसच सर्व होणार आहे. कुठलाही बदल नाहीय. त्यामुळे ड्राफ्ट शेड्युलवरुन आरडाओरडा करणाऱ्या पाकिस्तानची चांगलीच जिरवली आहे.

पाकिस्तानने केलेली एकही मागणी मान्य झालेली नाही. उलट सर्व मागण्या धुडकावून लावल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तान आता आणखी नाटक करण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानला या ठिकाणी सामने खेळावेच लागतील

पाकिस्तानला ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना 20 ऑक्टोबरला बंगळुरुत आणि अफगाणिस्तान विरुद्ध 23 ऑक्टोबरला चेन्नईतच खेळाव लागणार आहे. त्याशिवाय टीम इंडिया विरुद्ध चेन्नई, कोलकाता किंवा बंगळुरुमध्ये खेळण्याची इच्छा होती. पण पाकिस्तानला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच मॅच खेळावी लागेल.

पाकिस्तानच्या मागण्यांना केराची टोपली

पाकिस्तानला अफगाणिस्तान विरुद्धचा सामना बंगळुरु आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना चेन्नईत खेळायचा होता. तशी मागणी त्यांनी आयसीसीकडे केली होती. पण त्यांच्या या मागणांना केराची टोपली दाखवण्यात आली आहे.

पाकिस्तानचा पहिला सामना कधी?

पाकिस्तानने अजूनही भारतात वर्ल्ड कप खेळण्यासाठी होकार कळवलेला नाहीय. वर्ल्ड कप शेड्युलनुसार बाबर आजम कंपनीचा पहिला सामना 6 ऑक्टोबरला क्वालिफायर 1 विरुद्ध होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ही मॅच होईल.

PCB ने काय म्हटलय?

“भारताच्या कुठल्याही दौऱ्यासाठी PCB ला पाकिस्तान सरकारची परवानगी घ्यावी लागते. सामने कुठे खेळायचे? त्याची परवानगी सुद्धा घ्यावी लागते. काही आठवड्यांपूर्वी ड्राफ्ट शेड्युल मिळाल्यानंतर आम्ही आमच मत आयसीसीला कळवलं होतं” असं पीसीबीच्या प्रवक्त्याने जिओ टीव्हीला सांगितलं.

BCCI च्या दबावासमोर झुकावं लागलं

सरकारने परवानगी दिली, तरच पाकिस्तानी टीम भारत दौऱ्यावर येईल. बीसीसीआयच्या दबावामुळे आशिया कपचे काही सामने दुसऱ्या देशात होणार आहेत. पाकिस्तानात फक्त चार सामने होणार आहे. भारत-पाकिस्तान सामना श्रीलंकेत होणार आहे, यावर पाकिस्तान नाराज आहे. 2025 साठी भारताकडून आताच आक्षेप

पीसीबी आता पाकिस्तान सरकारच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत आहे. त्यानंतर लगेच आयसीसीला कळवण्यात येईल. 2025 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात आयोजित करण्यावर भारताने आधीच आक्षेप नोंदवला आहे. भारत पाकिस्तानचा दौरा करणार नाही, हे स्पष्ट संदेश यामागे आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.