IPL 2022: पराभवानंतर KL Rahul च्या डोक्यात काय चाललय? सोशल मीडियावर शेयर केली पोस्ट

IPL 2022: लखनौचा कॅप्टन केएल राहुलने या सीजनमध्ये जबरदस्त कामगिरी केली. त्याची एक वेगळी प्रतिमा चाहते आणि प्रेक्षकांच्या मनात आहे.

IPL 2022: पराभवानंतर KL Rahul च्या डोक्यात काय चाललय? सोशल मीडियावर शेयर केली पोस्ट
केएल राहूल
Image Credit source: social
| Updated on: May 27, 2022 | 5:07 PM

मुंबई: IPL च्या 15व्या हंगामात जोरदार कामगिरी करणारा नवा संघ लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow supergiants) प्रवास प्लेऑफमध्ये संपला. एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर(RCB) ने लखनऊला 14 धावांनी पराभूत केलं. पहिल्याच हंगामात चांगल्या कामगिरीमुळे लखनौ संघाचं सर्वत्र कौतुक झालं. लखनौचा कॅप्टन केएल राहुलने या सीजनमध्ये जबरदस्त कामगिरी केली. त्याची एक वेगळी प्रतिमा चाहते आणि प्रेक्षकांच्या मनात आहे. स्वदेशी बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग मंच, ‘कू’च्या माध्यमातून केएल राहुलने (KL Rahul) आभार मानताना एक भावनिक संदेश लिहिला.  “माझ्या सभोवताली प्रेरणा निर्माण करणारं वातावरण आहे. विशेष असलेला पहिला सीजन संपला. आम्हाला हवा तसा या सीजनचा शेवट झाला नाही. पण आम्ही आमच्याबाजूने सर्व प्रयत्न केले. LSG कुटुंब, सपोर्ट स्टाफ, टीम मॅनेजमेंट आणि डॉ.गोयंकांचे आभार. पहिल्या सीजनमध्ये तुम्ही जे प्रेम दिलतं, त्या बद्दल सर्व चाहत्यांचेही आभार” असं केएल राहुलने आपल्या संदेशात म्हटलं आहे.

त्या तिघांनी चांगला खेळ दाखवला

हा लखनऊ सुपर जायंट्सचा पहिला हंगाम होता. संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. लीगच्या सामन्यांबाबत बोलायचं तर, लखनौची टीम पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होती. या टीमने 14 सामन्यांपैकी 9 सामन्यात विजय मिळवला होता. प्लेऑफ मध्ये संघ एलिमिनेटरपर्यंत पोहोचला. मात्र रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून या संघाला पराभव पत्करावा लागला. तरीही टीमसाठी केएल राहुल, मोहसिन खान, आयुष बदोनी अशा खेळाडूंनी पूर्ण हंगामभर उत्कृष्ट खेळ केला.

केएल राहुलचा अनोखा रेकॉर्ड

आयपीएलच्या 15व्या हंगामात लखनौ सुपर जायंट्सचा संघ अंतिम फेरीपर्यंत प्रवास करू शकला नाही. मात्र कर्णधार केएल राहुलने स्वतःच्या नावे एक मोठं रेकॉर्ड बनवला. राहुल चार हंगामात 600 पेक्षाही जास्त धावा काढणारा फलंदाज बनला आहे. केएल राहुलने ख्रिस गेल आणि डेविड वॉर्नरचाही विक्रम तोडला आहे. हे दोघेही 3 हंगामांमध्ये 600 हून जास्त धावा बनवणारे खेळाडू आहेत.