AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: आधी पंजाब किंग्स आता LSG चं KL Rahul मुळे नुकसान? संजय मांजेरकरांचा महत्त्वाचा सवाल

प्रत्येक सीजनमध्ये राहुलने 600 किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. या सीजनमध्येही राहुलने अशीच फलंदाजी केली. त्याने 15 डावात 50 पेक्षा जास्त सरासरीने 616 धावा केल्या. मात्र तरीही लखनौ सुपर जायंट्सची (Lucknow super Giants) टीम फायनलमध्ये पोहोचू शकली नाही.

IPL 2022: आधी पंजाब किंग्स आता LSG चं KL Rahul मुळे नुकसान? संजय मांजेरकरांचा महत्त्वाचा सवाल
KL Rahul-Sanjay Manjrekar Image Credit source: PTI
| Updated on: May 26, 2022 | 4:11 PM
Share

मुंबई: लखनौ सुपर जायंट्सचा कॅप्टन KL Rahul च्या फलंदाजीच्या टेक्निकचे बरेच चाहते आहेत. कसोटी असो, वा वनडे किंवा T 20 केएल राहुल धावांच्या राशी उभारतो. आयपीएलच्या प्रत्येक सीजनमध्ये केएल राहुलने खोऱ्याने धावा केल्या आहेत. प्रत्येक सीजनमध्ये राहुलने 600 किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. या सीजनमध्येही राहुलने अशीच फलंदाजी केली. त्याने 15 डावात 50 पेक्षा जास्त सरासरीने 616 धावा केल्या. मात्र तरीही लखनौ सुपर जायंट्सची (Lucknow super Giants) टीम फायनलमध्ये पोहोचू शकली नाही. काल रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्धच्या सामन्यात केएल राहुलने लखनौकडून सर्वाधिक 78 धावा ठोकल्या. पण तरीही त्याच्यावरच टीका होतेय. माजी क्रिकेटपटू संजय मांजेरकर (Sanjay Manjrekar) यांनी केएल राहुलच्या मानसिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलय.

मी कोच असतो, तर….

“पंजाब किंग्ससाठी खेळताना पण केएल राहुलची हीच पद्धत होती. केएल राहुल खेळपट्टीवर जास्तवेळ टिकून फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. तो खेळपट्टिवर पाय रोवून उभ रहाण्याचा प्रयत्न करतो. पण मी कोच असतो, तर मी त्याला वेगळ्या पद्धतीने खेळायला सांगेन. माझ्या मते खेळपट्टीवर जास्तवेळ टिकण्यापेक्षा त्याने जास्त वेगाने धाव करणं आवश्यक आहे. केएल राहुल वेगाने धावा बनवतो, तेव्हा संघाला जास्त फायदा होतो, हे आपण पाहिलं आहे” असं संजय मांजरेकर ईएसपीएन क्रिकइंफोनशी बोलताना म्हणाले.

केएल राहुलच्या धीम्या फलंदाजीमुळे लखनौचा पराभव?

केएल राहुलचं धीम्यागतीने खेळणं, लखनौच्या पराभवाचं एक कारण आहे. राहुल 58 चेंडूत 79 धावांची इनिंग खेळला. पण 200 पेक्षा जास्त धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ही तशी धीमी इनिंग आहे. महत्त्वाचं म्हणजे राहुल स्वत:च अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 43 चेंडू खेळला. त्याशिवाय लखनौच्या डावात 43 चेंडू असे होते, ज्यावर धावाच निघाल्या नाहीत. केएल राहुलने शेवटपर्यंत फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यासाठी जो वेग आवश्यक होता, तो त्याला पकडता आला नाही.

मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.