IND vs WI: आणखी एका स्फोटक फलंदाजाचा टीम इंडियात समावेश, एका षटकात भारताच्या बाजूने झुकवू शकतो सामना

| Updated on: Feb 04, 2022 | 10:44 AM

वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे सीरीज सुरु होण्याआधी कोरोना व्हायरसने टीम इंडियाला झटका दिला आहे.

1 / 5
वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे सीरीज सुरु होण्याआधी कोरोना व्हायरसने टीम इंडियाला झटका दिला आहे. सीरीजसाठी संघात निवड झालेल्या तीन खेळाडूंना कोरोनाची बाध झाली आहे. त्यामुळे वनडे सीरीजमध्ये ते खेळण्याची शक्यता कमी आहे. लगचेच निवड समितीने त्या तिघांच्या जागी दोन नवीन खेळाडूंची निवड केली आहे. सर्वातआधी सलामीवीर मयंक अग्रवालला संघात स्थान देण्यात आलं. (Photo: BCCI)

2 / 5
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी सलामीवीर शिखर धवन, दुसरा सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर या तिघांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. अशात संघसमोर ओपनरची समस्या निर्माण झाली. उपकर्णधार केएल राहुलही पहिल्या वनडेसाठी उपलब्ध नाहीय. त्यानंतर बीसीसीआयने मयंक अग्रवालचा संघात समावेश केला. (Photo: AFP)

3 / 5
निवड समितीने आता विकेटकिपर फलंदाज इशान किशनचाही संघात समावेश केला आहे. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे. इशांत एक आक्रमक डावखुरा फलंदाज आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेसाठीही त्याचा संघात समावेश करण्यात आलाय. (Photo: File/BCCI)

4 / 5
इशान किशनने मागच्यावर्षी भारतासाठी वनडेमध्ये डेब्यू केला होता. श्रीलंका दौऱ्यावर पहिल्या डेब्युमध्ये त्याने फक्त 42 चेंडूत 59 धावा ठोकल्या होत्या. (Photo: File/BCCI)

5 / 5
आतापर्यंत तो दोन वनडे सामने खेळला आहे. ज्यात त्याने 60 धावा केल्या आहेत. इशान किशनला वेस्ट इंडिज विरुद्ध ओपनर म्हणून संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण रोहित शर्मा मयंक अग्रवालला प्राधान्य देऊ शकतो. (Photo: instagram)