Shubman Gill | रश्मिका मंदानानंतर आता शुभमन गिलला डीपफेकचा फटका, ‘तो’ फोटो व्हायरल

Shubman Gill | प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानाची सोशल मीडियावर चर्चा आहे. कारण तिचा एक डीपफेकचा व्हिडिओ व्हायरल झालाय. आता शुभमन गिलला सुद्धा या डीपफेकचा मोठा फटका बसलाय. भविष्यात अनेक सेलिब्रिटी अडचणीत येऊ शकतात.

Shubman Gill | रश्मिका मंदानानंतर आता शुभमन गिलला डीपफेकचा फटका, तो फोटो व्हायरल
Shubhaman Gill
| Updated on: Nov 09, 2023 | 9:29 AM

मुंबई : सध्या प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियावर रश्मिका मंदानाची चर्चा आहे. रश्मिकाचा एक डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये रशिमका मंदाना दिसतेय. पण हा व्हिडिओ मुळात दुसऱ्या मुलीचा आहे. फक्त तिथे AI टेक्नोलॉजीचा वापर करुन रश्मिकाचा चेहरा लावण्यात आलाय. या व्हिडिओवर अनेक सेलिब्रिटींनी आपलं रोखठोक मत व्यक्त केलं. असा व्हिडिओ बनवणाऱ्यावर कारवाईची मागणी केली. कारण टेक्नोलॉजीचा वापर करुन अशा प्रकारे एखाद्याची नाव, प्रतिमा खराब करता येऊ शकते. आता प्रसिद्ध क्रिकेटपटू शुभमन गिलला या डीपफेक टेक्नोलॉजीचा फटका बसलाय. त्याचा सारा तेंडुलकरसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मूळ फोटो दुसरा आहे. पण टेक्नोलॉजी वापरुन हा डीपफेक फोटो तयार करण्यात आलाय. फोटोसाठी पोझ देताना सारा शुभमन गिलला मिठी मारतेय असा तो फोटो आहे.

हा फोटो मॉर्फ करण्यात आलाय. ओरिजनल फोटो सारा आणि तिचा भाऊ अर्जून तेंडुलकरचा आहे. अर्जुन बर्थ डे ला साराने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता. पण काही उपद्रवींनी AI टेक्नोलॉजीचा वापर करुन अर्जुनच्या जागी शुभमनचा चेहरा जोडला. शुभमन गिलच नाव सारा तेंडुलकर बरोबर जोडलं जातं. शुभमन आणि सारा यांच्यात कथित अफेअरच्या बातम्या येत असतात. सोशल मीडियावर दोघांची चर्चा असते. सध्या वनडे वर्ल्ड कप 2023 सुरु आहे. मुंबईत वानखेडेवर एका सामन्याला सारा तेंडुलकर हजर होती. टीम इंडियाच्या सामन्यात शुभमन गिल बाद झल्यानंतर तिची Reaction सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.


सोशल मीडिया कंपन्यांसाठी गाईडलाइन्स जारी

या डीपफेक टेक्नोलॉजीचा जो उदय झालाय, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत. खासकरुन महिलांची चिंता वाढलीय. एखाद्याची इमेज खराब करण्यासाठी AI वापरुन बनवण्यात आलेले अशा इमेजेस आणि व्हिडिओ शोधून काढणं गरजेच आहे. असे डीपफेक व्हिडिओ शोधून ते हटवण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी सोशल मीडिया कंपन्यांसाठी गाईडलाइन्स जारी केल्या आहेत.