AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सामन्याआधी टीम इंडियाला ‘युजलेस’ म्हणणाऱ्या मायकल वॉनची नवी प्रतिक्रिया, भारताच्या विजयानंतर राग अनावर, म्हणाला…

चौैथ्या कसोटीत भारताने इंग्लंडवर दमदार विजय मिळवल्यावर टीम इंडियाचे टीकाकार मायकल वॉन पुन्हा जागा झाला आहे. त्याने आता नवी प्रतिक्रिया देत सामन्यानंतर आपलं मत प्रदर्शन केलं आहे.

सामन्याआधी टीम इंडियाला 'युजलेस' म्हणणाऱ्या मायकल वॉनची नवी प्रतिक्रिया, भारताच्या विजयानंतर राग अनावर, म्हणाला...
मायकल वॉन
| Edited By: | Updated on: Sep 07, 2021 | 3:01 PM
Share

लंडन :भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावात भारतीय संघ (India) 78 धावांमध्ये सर्वबाद झाला होता. त्यानंतर सामन्यातही भारताला एक डाव आणि 76 धावांनी लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला होता. त्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाचा नेहमीचा टीकाकार मायकल वॉन (Michael Vaughan) याने भारतीय संघावर ट्विट करत हल्ला केला.एका ट्विटमध्ये त्याने भारतीय संघाला थेट युजलेस (बिना कामाचे) असं म्हटलं होतं. पण चौथ्या कसोटीत भारताने 157 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवत वॉनसह सर्वच टीकाकारांची बोलती बंद केली आहे.

मायकल वॉनने भारताच्या विजयानंतर वैतागत आपला सर्व राग इंग्लंड संघावर काढला आहे. वॉन द टेलिग्राफला दिलेल्या माहितीत म्हटला की,’इंग्लंड कसोटी संघाची गोलंदाजी, फलंदाजी तसेच क्षेत्ररक्षणातील खराब प्रदर्शन सर्वांसमोर आलं आहे. इंग्लंडने संपूर्ण सामन्यात अतिशय खराब क्षेत्ररक्षण केलं. अनेक सोप्या संधी सोडल्यामुळे भारतीय फलंदाज मोठी धावसंख्या करु शकले. पहिल्या डावात महत्त्वाचे फलंदाज गेल्यानंतर इंग्लंडने भारताला 125 धावांवर सर्वबाद करायला हवं होतं. पण क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीतील खराब प्रदर्शनामुळे असं करता आलं नाही.’ दरम्यान भारताच्या या विजयामुळे मायकल वॉनच्या आधीच्या सर्व प्रतिक्रियांना भारतानं खेळातून चोख प्रत्यूत्तर दिल्याने त्याचा राग अनावर झाला आहे.

आधी काय म्हणाला होता वॉन?

तिसऱ्या कसोटीत भारताच्या पराभवानंतर मायकल वॉन भारतीय संघाला थेट युजलेस म्हटला होता. त्याने ट्विटमध्ये लिहिलं होतं की, “इंग्लंडकडून चमकदार आणि क्रूर कामगिरी, मिळेल तितकं कमीच. लॉर्ड्सनंतर असे प्रदर्शन करणे संघाचे कॅरेक्टर दर्शवते, जे त्यांच्या कर्णधाराकडून येतं… मागील काही दिवस भारताने विसरण्यासारखे आहेत. ते (टीम इंडिया) खरोखर युजलेस दिसत होते. ”

इतर बातम्या

तिसऱ्या कसोटीत पराभूत होणारी टीम इंडिया ‘युजलेस’; मायकल वॉनचा विराटसेनेवर वार

ING vs ENG : विराट सेनेनं इतिहास रचला, 50 वर्षानंतर ‘ओव्हल’ सर

IND vs ENG : फॉर्मात परतलेल्या पुजाराच्या शॉटने अंपायरचं डोकं फुटलं असतं, पाहा थरारक Video

(After saying Team india Useless Michael Vaughan now angry over england team After defeat in second test at oval)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.