ING vs ENG : विराट सेनेनं इतिहास रचला, 50 वर्षानंतर ‘ओव्हल’ सर

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 06, 2021 | 10:04 PM

भारतीय संघानं ओव्हलमध्ये 50 वर्षानंतर विजय संपादन केलाय. या विजयासह भारतीय संघानं कसोटी मालिकेत 2-1 ने आघाडी मिळवली आहे. शेवटचा सामना 10 सप्टेंबरला मॅन्चेस्टरमध्ये खेळवला जामार आहे. भारताने 35 वर्षानंतर इंग्लंडमध्ये एक सीरीजमध्ये 2 सामने जिंकले आहेत.

ING vs ENG : विराट सेनेनं इतिहास रचला, 50 वर्षानंतर 'ओव्हल' सर
ओव्हलच्या मैदानावर विराट सेनेनं इतिहास रचला

मुंबई : विराट सेनेनं अर्थात भारतीय कसोटी क्रिकेट संघानं (Indian Cricket Team) इंग्लंडमध्ये इतिहास रचलाय. ओव्हल टेस्टमध्ये टीम इंडियानं इंग्लंड संघाचा (England Cricket Team) 157 धावांनी पराभव केलाय. विजयासाठी आवश्यक असलेल्या 368 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ सामन्याच्या अखेरच्या दिवशी 209 धावांवर आटोपला. भारताकडून जसप्रीत बुरराह, रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूरने कमालीची गोंलदाजी केली आणि भारताला दूसरा कसोटी विजय मिळवून दिला. इंग्लंडने सकाळच्या सत्रात 27 षटकात दोन विकेटच्या बदल्यात 54 धावा बनवल्या. तर दुसऱ्या सत्रात 25.1 षटकात 62 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट गमावल्या. (Indian cricket team wins after 50 years at the Oval)

भारताकडून उमेश यादवने 3, तर बुमराह, शार्दुल ठाकूर आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या. भारतीय संघानं ओव्हलमध्ये 50 वर्षानंतर विजय संपादन केलाय. या विजयासह भारतीय संघानं कसोटी मालिकेत 2-1 ने आघाडी मिळवली आहे. शेवटचा सामना 10 सप्टेंबरला मॅन्चेस्टरमध्ये खेळवला जामार आहे. भारताने 35 वर्षानंतर इंग्लंडमध्ये एक सीरीजमध्ये 2 सामने जिंकले आहेत. भारतानं कपिल देव यांच्या नेृत्वाखाली 1986 मध्ये इंग्लंड विरोधातील कसोटी मालिकेत 2 सामन्यात विजय मिळवला होता.

इंग्लंडने दिवसाची सुरुवात विकेट न गमावता 77 धावांनी केली होती. उमेश यादव आणि जसप्रीत बुमराहच्या वेगवान माऱ्यानं भारतीय आक्रमणाची सुरुवात केली. हमीद आणि बर्न्सने पहिल्या अर्ध्यात तासात भारतीय गोलंदाजांना यश मिळू दिलं नाही. या दोन्ही फलंदाजांनी सावधगिरीनं खेळ खेळत खराब चेंडूचा चांगलाच समाचार घेतला. बर्न्सने शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर 2 धावांसह 124 चेंडून आपलं अर्धशतक पूर्ण केलं. सोबतच इंग्लंड संघाच्या 100 धावा पूर्ण झाल्या. दरम्यानस ठाकूरच्या पुढल्याच चेंडूवर बर्न्सने विकेटकीपर ऋषभ पंतच्या हातात कॅच दिला. तर हमीदने रविंद्र जडेजाच्या चेंडूवर तीन धावांसह 123 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.

रोहित शर्माची तुफानी खेळी

चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक झळकावले. परदेशी भूमीवरचे रोहितचे हे पहिले कसोटी शतक आहे. यापूर्वी त्याने परदेशात कसोटीत शतक झळकावले नव्हते. रोहितची शतक पूर्ण करण्याची शैलीही वेगळी होती. 64 व्या षटकात गोलंदाजी करणाऱ्या मोईन अलीच्या चेंडूवर त्याने शानदार षटकार मारून शतक पूर्ण केले. रोहित नोव्हेंबर 2013 मध्ये कोलकाता येथे पहिला कसोटी सामना खेळला होता, पण त्यानंतर तो कसोटीत परदेशी भूमीवर शतक झळकावू शकला नाही. ही कमतरता रोहितने यावेळी इंग्लंडमध्ये सात वर्षानंतर (2021) मध्ये पूर्ण केली. रोहितने षटकार मारून कसोटीत शतक पूर्ण करण्याची ही तिसरी वेळ आहे.

लॉर्ड शार्दुलची अष्टपैलू कामगिरी

इंग्लंडविरुद्ध सुरू ओव्हल कसोटी सामन्यात भारताच्या टॉपच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यानंतर गोलंदाज शार्दूल ठाकूर पुन्हा एकदा संकटमोचक म्हणून धावून आला. पहिल्या डावात शार्दूलने मैदानावर तळ ठोकून टिच्चून फलंदाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसे काढली. शार्दूलने 36 चेंडूत 7 चौकार आणि तीन षटकार ठोकत दमदार 57 धावा कुटल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने कशीबशी 191 धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या डावातही भारताचा डाव 350 धावांमध्ये संपुष्टात होईल असे वाटत असताना पुन्हा एकदा शार्दुल टीम इंडियासाठी धावून आला. दुसऱ्या डावात त्याने 72 चेंडूत 60 धावांची खेळी करत भारताला 400 धावांचा टप्पा पार करुन दिला.

इतर बातम्या :

VIDEO | IND vs ENG : बुम बुम! यॉर्करकिंगचा विकेट्सचं शतक, कपिल देवला पछाडत विक्रमाला गवसणी

IND vs ENG: सिराजची एक चूक भारताला पडणार महाग?, VIDEO पाहूल भारतीय प्रेक्षक नाराज

Indian cricket team wins after 50 years at the Oval

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI