आयपीएलनंतर बांगलादेश विरुद्ध आयर्लंड सामन्यात शेवटच्या षटकातला थरार, पाहा नेमकं काय झालं Video

Ireland vs Bangladesh: बांगलादेशने आयर्लंडला नो बॉलच्या जोरावर पराभूत केलं आहे. मागच्या आठवड्यात नो बॉलमुळे असाच काहीसा विजय सनराइजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्स विरोधात मिळवला होता.

आयपीएलनंतर बांगलादेश विरुद्ध आयर्लंड सामन्यात शेवटच्या षटकातला थरार, पाहा नेमकं काय झालं Video
आयपीएलनंतर बांगलादेश विरुद्ध आयर्लंड सामन्यात शेवटच्या षटकातील थरार, पाहा नेमकं काय झालं Video
| Updated on: May 13, 2023 | 4:27 PM

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद यांच्यातील थरार ताजा असताना तसंच काहीसं बांगलादेश विरुद्ध आयर्लंड सामन्यात पाहायला मिळाला. आयपीएलमध्ये नो बॉलमुळे सनराईजर्स हैदराबादने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला होता. नो बॉलमुळे अशी; काहीशी मदत बांगलादेश संघाला झाली. हा सामना जवळपास बांगलादेशने गमावलाच होता. पण नो बॉलमुळे शेवटच्या षटकात 3 विकेट्सने हा सामना जिंकला.

आयर्लंडने फलंदाजी करताना पावसाने बाधित झालेल्या सामन्यात 45 षटकात 6 गडी गमवून 319 धावा केल्या. हॅरी टेक्टरने 113 चेंडूत 140 धावा केल्या. तर जॉर्ज डॉकरेलने 47 चेंडूत नाबाद 74 धावा केल्या. धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेशने 44.3 षटकात 7 गडी गमवून हे लक्ष्य गाठलं. नझमुल हुसैन शंटोने 93 चेंडूत 117 धावा केल्या. शेवटच्या षटकात बांगलादेशला 5 धावांची आवश्यकता होती.

मार्क एडायरने पहिले दोन चेंडू निर्धाव टाकले. मुशफिकुर रहीमला एकही धाव घेता आली नाही. त्यानंतरच्या चेंडूवरही धाव घेता आली नाही. तेव्हा हा सामना बांगलादेशच्या हातातून निसटताना दिसला. तेव्हा पंचांनी हा चेंडू नो असल्याचं सांगितलं. मुशफिकुरने या संधीचं सोनं केलं. फ्री हिटवर विकेटकीपरच्या वरून चौकार ठोकला आणि संघाला विजय मिळवून दिला.

बांगलादेशकडे आता 1-0 ने आघाडी आहे आणि एक सामना बाकी आहे. अंतिम सामना रविवारी खेळला जाणार आहे. पहिला सामना पावसामुळे होऊ शकला नाही. यामुळे दक्षिण आफ्रिकेला फायदा झाला असून वर्ल्डकपमध्ये थेट एन्ट्री मिळाली आहे.

दोन्ही संघाचे खेळाडू

आयर्लंडचा संघ : स्टीफन डोहेनी, पॉल स्टिर्लिंग, अँड्रू बालबिर्नि, हॅरी टेक्टर, लोर्कन टकर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडेअर, अँडी मॅकब्रिन, ग्रॅहम हुम, जोशुआ लिटल

बांगलादेशचा संघ : तमिम इकबाल, लिटन दास, नजमुल होसैन शांटो, शाकिब अल हसन, तोव्हिद ह्रिदोय, मुशफिकर रहिम, मेहिदी हसन, तैजुल इस्लाम, शोरीफुल इस्लाम, हसन महमुद, इबादोच होसैन