AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Naveen ul haq IPL 2023 : विराटला नडणाऱ्या नवीन उल हकला Mumbai Indians च्या तीन खेळाडूंनी शिकवला धडा

Naveen ul haq IPL 2023 : नवीन उल हकला आंब्यासह दिला निरोप. सतत पंगे घेणाऱ्या नवीन उल हकला उत्तर देणारे मुंबई इंडियन्सचे ते तीन खेळाडू कोण? मुंबई इंडियन्सने क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला आहे.

Naveen ul haq IPL 2023 : विराटला नडणाऱ्या नवीन उल हकला Mumbai Indians च्या तीन खेळाडूंनी शिकवला धडा
naveen ul haq lsg vs mi ipl 2023Image Credit source: ipl
| Updated on: May 25, 2023 | 8:15 AM
Share

चेन्नई : Mumbai Indians ने क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला आहे. एलिमिनेटरमध्ये मुंबईने लखनऊ सुपर जायंट्सवर 81 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या पराभवासह लखनऊच IPL 2023 मधील आव्हान संपुष्टात आलं. मुंबईने या विजयासह लीग स्टेजमधील पराभवाचा वचपा काढला. साखळी फेरीत लखनऊने मुंबई इंडियन्सला 5 धावांनी पराभूत केलं होतं. पंगे घेणारा लखनऊचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक IPL 2023 च्या सीजनमध्ये चर्चेत राहिला. जाता-जाता मुंबईच्या प्लेयर्सनी या नवीन उल हकला उत्तर दिलं. या टुर्नामेंटमध्ये लखनऊची टीम वादात जास्त राहिली.

रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्धच्या सामन्यावेळी नवीन उल हक विराट कोहलीला भिडला होता. त्यानंतर नवीनने आंबा घेऊन सोशल मीडियावर कोहलीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

चांगला खेळला पण टीम बाहेर

कोहली बरोबर वाद झाल्यानंतर नवीन टीमच्या बाहेर गेला. पुनरागमन केलं, तेव्हा फॉर्म हरवलेला होता. एलिमिनेटरच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. पण लखनऊची टीम बाहेर गेली होती. आता मुंबई इंडियन्सच्या 3 खेळाडूंनी वादग्रस्त खेळाडू नवीन उल हकला उत्तर दिलय.

नवीन वाईट पद्धतीने ट्रोल

एलिमिनेटरच्या सामन्यात नवीन उल हकने 38 धावात 4 विकेट घेतल्या. 4 विकेट घेतल्यानंतर त्याने नो नॉइज सेलिब्रेशन केलं. मॅच संपल्यानंतर संदीप वॉरियर, विष्णु विनोद आणि कुमार कार्तिकेयने नवीनवर निशाणा साधला. तिघांनी टेबलवर आंबा ठेवला व नो नॉइजची मुद्रा केली. म्हणजे वाईट पाहू नका, वाईट बोलू नका. संदीपने पोस्टमध्ये मँगोचा स्वीट सीजन असं लिहिलं होतं. संदीपने नंतर ही पोस्ट डिलीट केली. पण तो पर्यंत ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

नवीनने मुंबईच्या कुठल्या फलंदाजांना OUT केलं?

नवीन उल हकने एलिमिनेटरच्या सामन्यात रोहित शर्मा, कॅमरुन ग्रीन, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या चार महत्वाच्या फलंदाजांना बाद केलं. मुंबईने काल पहिली बॅटिंग केली. 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट गमावून 182 धावा केल्या. त्यानंतर लखनऊची टीम मुंबईच्या गोलंदाजांसमोर टिकली नाही. संपूर्ण टीम 16.3 ओव्हर्समध्ये 101 रन्सवर ऑलआऊट झाली. सलग दुसऱ्यांदा लखनऊचा एलिमिनेटरमध्ये पराभव झाला. मुंबईच्या आकाश मढवालने 3.3 ओव्हर्समध्ये 5 धावा देऊन 5 विकेट काढल्या.

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.