Ajinkya Naik : ठरलं, अजिंक्य नाईक उतरणार मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत

Ajinkya Naik : वानखेडे स्टेडियमवर 23 जूनला एमसीएच्या अध्यक्षपदाची निवडणूक होईल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मिलिंद नार्वेकर आणि एमसीए उपाध्यक्ष संजय नाईक सुद्धा अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत.

Ajinkya Naik : ठरलं, अजिंक्य नाईक उतरणार मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत
Ajinkya Naik
Follow us
| Updated on: Jul 10, 2024 | 11:25 AM

मागच्या काही दिवसांपासून मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक चर्चेचा विषय बनली आहे. या निवडणुकीसंदर्भात एक महत्त्वाची घडामोड आहे. मुंबई क्रिकेट संघटनेचे सचिव अजिंक्य नाईक या शर्यतीत आघाडीवर असून आज ते अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील. दिवंगत अध्यक्ष अमोल काळे यांचं 10 जूनला अमेरिका न्यू यॉर्क येथे निधन झालं. वानखेडे स्टेडियमवर 23 जूनला एमसीएच्या अध्यक्षपदाची निवडणूक होईल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मिलिंद नार्वेकर आणि एमसीए उपाध्यक्ष संजय नाईक सुद्धा अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत.

“वरिष्ठ खेळाडू आणि विविध क्लबच्या सचिवांशी बोलल्यानंतर मी एमसीएच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवावी असं त्यांनी मला सुचवलं. सर्व संबंधितांशी बोलल्यानंतर 10 जुलैपूर्वी मी निर्णय घेईन” असं अजिंक्य नाईक म्हणाले होते. रेकॉर्ड 286 मत मिळवून अजिंक्य नाईक ऑक्टोंबर 2022 मध्ये MCA चे सचिव झाले होते.

राजकारण्यांविषयी MCA मध्ये मत बदलतय

क्रिकेट विषयी कमी माहिती असूनही राजकारण्यांना क्रिकेटच्या प्रेमापेक्षा पण अन्य कारणांसाठी MCA च अध्यक्ष बनायच असतं, अशी भावना एमसीएमध्ये आहे. “अजिंक्यना सिस्टिम कशी चालते ते माहित आहे. एमसीए सचिव म्हणून त्यांनी चांगलं काम केलय. अध्यक्षपदासाठी ते योग्य उमेदवार आहेत” असं एमसीएमधील सूत्रांनी सांगितलं. मागच्यावेळी झालेल्या MCA च्या निवडणुकीत पवार-शेलार गटाकडून अमोल काळे यांनी बाजी मारलेली. त्यांनी माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा पराभव केला होता.

Non Stop LIVE Update
केंद्राच्या कांदा निर्यातबंदीने यंदा झाले तब्बल आठ लाख मे. टनचे नुकसान
केंद्राच्या कांदा निर्यातबंदीने यंदा झाले तब्बल आठ लाख मे. टनचे नुकसान.
मुंबई ते नाशिक महामार्गाची अक्षरश : चाळण, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी
मुंबई ते नाशिक महामार्गाची अक्षरश : चाळण, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी.
ताम्हिणी घाटात 24 तासात तब्बल 556 मिमी पाऊस, पश्चिम घाटात अतिवृष्टी
ताम्हिणी घाटात 24 तासात तब्बल 556 मिमी पाऊस, पश्चिम घाटात अतिवृष्टी.
पुण्यात पावसाचा कहर, 18 वर्षांनंतर आळंदीला जोडणारा पुल पाण्याखाली...
पुण्यात पावसाचा कहर, 18 वर्षांनंतर आळंदीला जोडणारा पुल पाण्याखाली....
बदलापूरात NDRF चे पथक दाखल, उल्हासनदीने धोक्याची पातळी ओलांडली...
बदलापूरात NDRF चे पथक दाखल, उल्हासनदीने धोक्याची पातळी ओलांडली....
'लाडकी बहीण लाडका भाऊ एकत्र आले असते तर...,' काय म्हणाले राज ठाकरे
'लाडकी बहीण लाडका भाऊ एकत्र आले असते तर...,' काय म्हणाले राज ठाकरे.
'मोठ्याने घोषणा केली म्हणजे तुम्हाला...,' काय म्हणाले राज ठाकरे
'मोठ्याने घोषणा केली म्हणजे तुम्हाला...,' काय म्हणाले राज ठाकरे.
आपल्याकडे असं वातावरण असताना आपण धू धू धुतोय...,'काय म्हणाले राज ठाकरे
आपल्याकडे असं वातावरण असताना आपण धू धू धुतोय...,'काय म्हणाले राज ठाकरे.
मुंबईत पावसाचे धुमशान, मांटुग्यात रस्ता पाण्याखाली; पालिका प्रशासन फेल
मुंबईत पावसाचे धुमशान, मांटुग्यात रस्ता पाण्याखाली; पालिका प्रशासन फेल.
म्हणून सकाळी धरणाचं पाणी सोडण्याचा निर्णय घेतला; अजित पवार यांचं विधान
म्हणून सकाळी धरणाचं पाणी सोडण्याचा निर्णय घेतला; अजित पवार यांचं विधान.