
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) सलग दुसऱ्या सामन्यातही क्रिकेट चाहत्यांना फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला आहे. सनरायजर्स हैदराबादनंतर आता रविवारी 29 मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या पहिल्याच सामन्यात 200 पार धावा केल्या आहेत. केकेआरने वानखेडे स्टेडियममध्ये होम टीम मुंबई इंडियन्ससमोर 221 धावांचं आव्हान ठेवलं आहे. केकेआरने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 220 धावा केल्या आहेत. केकेआरसाठी कर्णधार अजिंक्य रहाणे आणि युवा फलंदाज अंगकृष रघुवंशी या मुंबईकर फलंदाजांनी सर्वाधिक धावा केल्या. दोघांनीही केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे केकेआरला 220 धावांपर्यंत पोहचता आलं. तसेच इतर फलंदाजांनीही यात योगदान दिलं.
मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत सर्वोच्च 219 धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. त्यामुळे मुंबईला हा सामना जिंकायचा असेल तर कोणत्याही स्थितीत 221 धावा कराव्या लागणार आहेत. त्यामुळे पलटण 221 धावा करण्यात यशस्वी ठरणार की केकेआर विजयी सलामी देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
केकेआरसाठी अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी या दोघांव्यतिरिक उपकर्णधार रिंकु सिंह, फिन एलन आणि कॅमरुन ग्रीन या तिघांनीही प्रमुख योगदान दिलं.
केकेआरसाठी अजिंक्य रहाणे याने 40 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 67 धावा केल्या. रहाणेने 40 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 3 फोरसह 67 रन्स केल्या. तसेच युवा फलंदाज अंगकृषने 29 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 51 धावा केल्या. अंगकृष केकेआरसाठी 19 व्या मोसमात अर्धशतक करणारा दुसरा फलंदाज ठरला.
कोण मिळवणार 2 गुण?
Innings Break!
Half-centuries by Captain Ajinkya Rahane and Angkrish Raghuvanshi led @KKRiders‘ effort 🔝
Who bags the 2⃣ points tonight? 🤔
Scorecard ▶️ https://t.co/JmJcgsoHQ7#TATAIPL | #KhelBindaas | #MIvKKR pic.twitter.com/D6h9Tk18z5
— IndianPremierLeague (@IPL) March 29, 2026
ऑलराउंडर कॅमरुन ग्रीन याला चांगली सुरुवात मिळली. मात्र ग्रीन या खेळीला मोठ्या आकड्यात बदलण्यात अपयशी ठरला. ग्रीनने 18 धावा केल्या. फिन एलन याने 17 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 6 फोरसह 37 रन्स केल्या. तर अखेरच्या क्षणी रिंकु सिंग याने फिनिशर या टॅगला न्याय दिला. रिंकुने 157. 14 च्या स्ट्राईक रेटने 21 बॉलमध्ये नॉट आऊट 33 रन्स केल्या. रिंकूने या खेळीत 4 फोर लगावले. तर रमनदीप सिंह याने नाबाद 4 धावा केल्या. मुंबईसाठी सर्वाधिक विकेट्स शार्दुल ठाकुर याने घेतल्या. शार्दुलने 3 विकेट्स मिळवल्या. तर कर्णधार हार्दिक पंड्या याने 1 विकेट मिळवली.