उघडपणे खोटं बोलत आहे हेड कोच…! अल्झारी जोसेफचा सॅमीवर खळबळजनक आरोप

वेस्ट इंडिज क्रिकेटमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. अल्झारी जोसेफ आणि डॅरेन सॅमी यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला आहे. डॅरेन सॅमी याने सर्वांसमोर खोटं बोलला, असा आरोप अल्झारी जोसेफ याने केला आहे. चला जाणून घेऊयात नेमकं काय प्रकरण आहे ते..

उघडपणे खोटं बोलत आहे हेड कोच...! अल्झारी जोसेफचा सॅमीवर खळबळजनक आरोप
उघडपणे खोटं बोलत आहे हेड कोच...! अल्झारी जोसेफचा सॅमीवर खळबळजनक आरोप
Image Credit source: PTI
| Updated on: Jul 31, 2026 | 4:28 PM

वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ याने हेड कोच डॅरेन सॅमीवर खळबळजनक आरोप केला आहे. डॅरेन सॅमी खोटंनाटं पसरवत असल्याचा आरोप अल्झारी जोसेफ याने केला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतून अल्झारी जोसेफ याला वगळण्यात आलं आहे. अल्झारीनेच निवड करू नका असं सांगितल्याचा दावा डॅरेन सॅमी यांनी केला होता. त्यावर आता अल्झारीने प्रत्युत्तर देत सांगितलं की, वैयक्तिक कारणामुळे कसोटी मालिकेत खेळत नाही. पण डॅरेन सॅमी काहीतरी सांगून खोटं पसरवत आहे. वेस्ट इंडिजचे मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांनी एका पत्रकार परिषदेत खुलासा केला होता की, अल्झारी जोसेफला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी निवडलं होतं. पण त्यानेच संघाचा भाग न होण्याचा निर्णय घेतला. जोसेफने घेतलेल्या निर्णयात हस्तक्षेप करण्यापलीकडे होता.

डॅरेन सॅमी यांनी क्रिकेट वेस्ट इंडिजच्या अधिकाऱ्यांना सदर स्थितीवर योग्य तो तोडगा काढण्याचा सल्ला दिला होता. कारण करारबद्ध खेळाडू निवड करण्यास मनाई करत आहेत. यावर अल्झारी जोसेफ याने उत्तर दिलं आहे. त्याने सांगितलं की, कसोटी मालिका खेळण्यासाठी फिट नव्हता. तसेच कोच डॅरेन सॅमी यांना सर्वकाही सांगितलं होतं. दुसऱ्यांदा स्ट्रेबस फ्रॅक्चरनंतर सावरत होतो. गुड मॉर्निंग जोजो या क्रीडा कार्यक्रमात बोलताना अल्झारी जोसेल याने डॅरेन सॅमी यांचे सर्व दावे फेटाळून लावले. संघ जाहीर करण्यापूर्वीच सॅमी यांना सर्व काही माहिती होतं, तरीही त्यांनी अशी वक्तव्य केल्याने आश्चर्याचा धक्का बसला आहे.

अल्झारी जोसेफ म्हणाला की, ‘मुख्य प्रशिक्षकांशी माझे बोलणे झाले. मी क्रिकेट वेस्ट इंडिजशी सुद्धा बोललो, आणि तुम्हाला माहीत असेलच की क्रिकेट वेस्ट इंडिजशने जारी केलेल्या निवेदनात वैयक्तिक कारणांचा उल्लेख आहे. सॅमी बऱ्याच काळापासून या खेळात आहे, त्यामुळे त्याच्या वक्तव्याचा काय परिणाम होईल हे त्याला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे, खरे सांगायचे तर, सॅमीच्या वक्तव्याबद्दल मी काहीही बोलू शकत नाही.’ अल्झारी जोसेफ आणि वाद हे काही नवीन नाही. यापूर्वीही त्याने 2024 इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यात कर्णधार शे होपसोबत वाद घातला होता. जोसेफने एक षटकात एक विकेट घेतली आणि न सांगता मैदान सोडून गेला होता. तेव्हा वेस्ट इंडिजला 10 खेळाडूंसह फिल्डिंग करावी लागली होती. या सामन्यात त्याने दोनदा असं केलं होतं. त्यामुळे वेस्ट इंडिज क्रिकेटने त्याच्या दोन सामन्यांची बंदी घातली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us