IPL 2024 ऑक्शनमध्ये कोट्यधीश, आता मोठी जबाबदारी, भाग्यवान खेळाडू कोण?

Cricket | आयपीएल ऑक्शन 2024 मधून एकूण 10 फ्रँचायजींनी 72 खेळाडूंना खरेदी केलं. या लिलावातील सर्वात पाचवा महागडा ठरलेल्या खेळाडूला आणखी एक लॉटरी लागली आहे. कोण आहे तो भाग्यवान खेळाडू.

IPL 2024 ऑक्शनमध्ये कोट्यधीश, आता मोठी जबाबदारी, भाग्यवान खेळाडू कोण?
ipl 2024
| Updated on: Dec 21, 2023 | 3:54 PM

मुंबई | आयपीएल 17 व्या हंगामासाठी मंगळवारी 19 डिसेंबर रोजी दुबईत मिनी ऑक्शन पार पडलं. या ऑक्शनमधून 72 खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडण्यात आला. काही खेळाडूंना अपेक्षेपेक्षा दुप्पट तिप्पट रक्कम मिळाली. काहींनी विक्रम रचला. तर काहींना बेस प्राईजवरच समाधान मानावं लागंल. या ऑक्शमध्ये एका खेळाडूला 10 कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळाली. ऑक्शननंतर 3 दिवसांनीच या खेळाडूला आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. या खेळाडूला टीममध्ये मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

वेस्ट इंडिज ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेत क्रेग ब्रेथवेट हा विंडिजचं नेतृत्व करणार आहे. तर स्टार खेळाडू अल्झारी जोसेफ याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी उपकर्णधार करण्यात आलं आहे. अल्झारी जोसेफला ऑक्शनमध्ये तब्बल 11 कोटी 50 लाख रुपये मिळाले. आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने अल्झारीला आपल्या ताफ्यात घेतलंय.

अल्झारीला अपेक्षेपेक्षा अधिक रक्कम मिळाली. अल्झारी या ऑक्शनमधील पाचवा सर्वात महागडा खेळाडू ठरला. अल्झारी याआधी मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. अल्झारीने आयपीएलमध्ये 19 सामन्यांमध्ये 20 विकेट्स घेतल्या आहेत. विंडिजने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या कसोटी मालिकेसाठी संघात एकूण 7 नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. या 7 खेळाडूंमध्ये जाचरी मॅक्कासी, विकेटकीपर टेविन इमलाच, ऑलराउंडर जस्टिन ग्रीव्स, केवम हॉज, केविन सिंक्लेयर, अकीम जॉर्डन आणि शमर जोसेफ यांचा समावेश आहे.

अल्झारी जोसेफची टी 20 कारकीर्द

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 17 ते 21 जानेवारी, एडलेड.

दुसरा सामना, 25 ते 29 जानेवारी, ब्रिस्बेन.

दरम्यान कसोटी मालिकेनंतर उभयसंघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. तर 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेने विंडिजच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सांगता होईल.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विंडिज टीम

कसोटी मालिकेसाठी विंडिज टीम | क्रॅग ब्रॅथवेट (कॅप्टन), अल्झारी जोसेफ (उपकर्णधार), टॅगनारायण चंद्रपॉल, किर्क मँकेंजी, एलिक अथानाजे, केवम हॉज, जस्टिन ग्रीव्स, जोशुआ डा सिल्वा, अकीम जॉर्डन, गुडाकेश मोती, केमार रोच, केविन सिंक्लेयर, टेविन इमलाच, शमर जोसेफ, जाचरी मॅक्कास्की.