AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SL Vs ENG : 109 कसोटी सामन्यांचा अनुभव असलेल्या खेळाडूने केली नको ती चूक, संघाचंही केलं नुकसान

इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 236 धावा केल्या. धनंजय डिसिल्वा आणि मिलन रथनायके यांनी डाव सावरला म्हणून इथपर्यंत मजल मारता आली. पण 109 कसोटी खेळलेल्या दिग्गज चूक करून बसला.

SL Vs ENG : 109 कसोटी सामन्यांचा अनुभव असलेल्या खेळाडूने केली नको ती चूक, संघाचंही केलं नुकसान
| Updated on: Aug 21, 2024 | 10:58 PM
Share

तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या मालिकेतील पहिला सामना सुरु असून नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्याने हा निर्णय चुकला असंच वाटलं. पण मधल्या फळीत धनजंय डिसिल्वाने झुंजार खेळी केली. त्याला तळाच्या मिलन रथनायकेची उत्तम साथ दिली. धनंजय डिसिल्वाने 84 चेंडूत 74, तर मिलन रथनायकेने 135 चेंडूचा सामना करत 72 धावा केल्या. यामुळे पहिल्या डावात श्रीलंकेला 236 धावांपर्यंत मजल मारता आली. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने 3, गस एटकिनसनने 2, शोएब बशीरने 3 आणि मार्क वूडने 1 गडी बाद केला. या सामन्यात श्रीलंकेची नाजूक स्थिती असताना 109 कसोटी सामन्यांचा अनुभव असलेला खेळाडूकडून अपेक्षा होती. अँजेलो मॅथ्यूज एक अनुभवी फलंदाज आहे. मात्र एका चुकीमुळे संघाचं नुकसान करून बसला.

37 वर्षीय अँजेलो मॅथ्यूज चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. संघाची स्थिती नाजूक असताना डाव सावरण्याची अपेक्षा होती. पण 5 चेंडूंचा सामना करत तंबूत परतला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. शून्यावर बाद होणं ही काही मोठी गोष्ट नाही. अनेक दिग्गज खेळाडू शून्यावर बाद झाले आहेत. पण मॅथ्यूज ज्या पद्धतीने बाद झाला ते निराशाजनक होतं. वोक्सचा चेंडू ऑफ स्टंपच्या रेषेत होता, तरीही मॅथ्यूजने वेल लेफ्ट करत बॅट उंचावली आणि इथेच चूक करून बसला. चेंडू पडल्याबरोबर आत घुसला आणि मॅथ्यूजच्या पॅडला लागला.

इंग्लंडकडून एलबीडब्ल्यूसाठी जोरदार अपील करण्यात आली. पंचांनी क्षणाचाही विलंब न करता बाद असल्याचं घोषित केलं. त्यामुळे मॅथ्यूजने रिव्ह्यू घेतला. पण हा निर्णयही चुकला असंच म्हणावं लागेल.  विकेट पण गेली आणि रिव्ह्यू देखील वाया गेला. त्यामुळे श्रीलंकेला आपल्या डावाच्या 7 व्या षटकातच तिसरी विकेट गमवण्याची वेळ आली. दरम्यान, श्रीलंकेने पहिल्या डावात 10 गडी गमवून 236 धावा केल्या. तर इंग्लंडने या धावांचा पाठलाग करताना सावध सुरुवात केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला असून इंग्लंडने बिनबाद 22 धावा केल्या आहेत. श्रीलंकेकडे अजूनही 214 धावांची आघाडी आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.