IND U19 vs AUS U19: वडिलांसमोरच आर्यवीरने दाखवला सेहवाग अंदाज; 5 चौकार मारल्यानंतर केली चूक

IND Under-19 vs AUS Under-19: आर्यवीर सहवागने भारतीय संघासाठी आपल्या पदार्पणाच्या डावात 26 चेंडूंत 28 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने 5 उत्कृष्ट चौकार लगावले. हा सामना पाहण्यासाठी खुद्द वीरेंद्र सेहवाग मैदानात उपस्थित होता.

IND U19 vs AUS U19: वडिलांसमोरच आर्यवीरने दाखवला सेहवाग अंदाज; 5 चौकार मारल्यानंतर केली चूक
IND U19 vs AUS U19: वडिलांसमोरच आर्यवीरने दाखवला सेहवाग अंदाज; 5 चौकार मारल्यानंतर केली 'ही' चूक
Image Credit source: Twitter
| Updated on: Sep 18, 2026 | 5:45 PM

भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागचा सुपुत्र आर्यवीर सेहवागने इंडिया ‘अ’ 19 वर्षाखालील संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या पहिल्या यूथ वनडे सामन्यात आर्यवीरने वडिलांच्याच स्टाईलमध्ये मैदानात चौकारांची बरसात केली, मात्र एका चुकीमुळे त्याला मोठी खेळी उभारण्यात अपयश आले. आपल्या मुलाचा हा पहिलाच ऐतिहासिक डाव पाहण्यासाठी वीरेंद्र सहवाग स्वतः स्टेडियमवर उपस्थित होता.

वडिलांच्या समोर ‘वीरू स्टाईल’ बॅटिंग

आर्यवीरने आपल्या डावातील पाचव्या चेंडूवर शानदार चौकार मारून खात्याचे उद्घाटन केले. यानंतर त्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकातही उत्कृष्ट चौकार वसूल केले. त्याने पाचव्या षटकात ऑस्ट्रेलियाचा लेग-ब्रेक गोलंदाज स्पेन्सर ग्रीनच्या गोलंदाजीवर एक कडक चौकार मारला. मात्र, याच षटकात मोठा फटका खेळण्याच्या नादात त्याने एक चूक केली आणि स्पेन्सर ग्रीननेच त्याला बाद केले. आर्यवीरने बाद होण्यापूर्वी 26 चेंडूंत 5 चौकारांसह 28 धावांची वेगवान खेळी केली. आपल्या मुलाने अर्धशतक करावे अशी वीरेंद्र सहवाग यांची इच्छा असेलही, पण या वेगवान सुरुवातीने त्याने वडिलांचे मन नक्कीच जिंकले.

पावसामुळे हा पहिला एकदिवसीय सामना प्रत्येकी 20 षटकांचा करण्यात आला होता. आर्यवीर बाद झाल्यानंतर कर्णधार लक्ष्य रायचंदानी 15 धावांवर, तर कुशाग्र ओझा 16 धावांवर बाद झाला. त्यानंतर अर्जुन राजपूतनेही 15 धावांची खेळी केली.ठराविक अंतराने विकेट्स पडत असताना यशवर्धन चौहान आणि भारताचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविडने संघाचा डाव सावरला. या दोघांनी जलद भागीदारी रचत भारताला मजबूत स्थितीत पोहोचवले. सहसा बचावात्मक खेळण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडच्या मुलाने, म्हणजेच अन्वयने यावेळी मैदानात तुफान फटकेबाजी केली. अन्वयने अवघ्या 18 चेंडूंमध्ये 38 धावांची नाबाद व स्फोटक खेळी खेळली, ज्यामध्ये त्याने 3 उत्तुंग षटकार आणि 2 चौकार लगावले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us