Ashes 2025: तिसऱ्या कसोटीत इंग्लंडची नाजूक स्थिती, ऑस्ट्रेलियाच्या पहिल्याच दिवशी 326 धावा

एशेज कसोटी मालिकेतील तिसरा सामना एडलेड ओव्हल मैदानात होत आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशीचा खेळ ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. हा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकल्यास मालिका खिशात घालणार आहे.

Ashes 2025: तिसऱ्या कसोटीत इंग्लंडची नाजूक स्थिती, ऑस्ट्रेलियाच्या पहिल्याच दिवशी 326 धावा
Ashes 2025: तिसऱ्या कसोटीत इंग्लंडची नाजूक स्थिती, ऑस्ट्रेलियाच्या पहिल्याच दिवशी 326 धावा
Image Credit source: England Cricket Twitter
| Updated on: Dec 17, 2025 | 3:56 PM

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसावर कांगारूंनी वर्चस्व गाजवलं. पहिल्या दोन सामन्यात कर्णधारपद भूषवलेला स्टीव्ह स्मिथ या सामन्यात खेळत नाही. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. नाणेफेकीवेळी कर्णधार पॅट कमिन्सने सांगितलं की, स्टीव्ह गेल्या काही दिवसांपासून थोडासा आजारी आहे. तो आज सकाळी आला आणि त्याने त्यातून सावरण्याचा प्रयत्न केला. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची सुरुवात काही चांगली झाली नाही. पण त्याला उठता आले नाही. पण मधल्या फळीत उस्मान ख्वाजा आणि एलेक्स कॅरे यांनी डाव सावरला. त्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 8 गडी गमवून 326 धावांपर्यंत मजल मारली.

एशेज सीरिजमध्ये प्रथम फलंदाजी करताना ट्रेव्हिस हेड 10, जेक वेदराल्ड 18, मार्नस लाबुशेन 19 आणि कॅमरून ग्रीन 0 धावांवर बाद झाला. त्यानंतर उस्मान ख्वाजा आणि एलेक्स कॅरे यांनी डाव सावरला. पाचव्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. उस्मान क्वाजा 126 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 82 धावा करून बाद झाला. तर एलेक्स कॅरेने 143 चेंडूत 106 धावा केल्या आणि तंबूत परतला. जोश इंग्लिस 32, पॅट कमिन्स 13 धावांवर बाद झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मिचेल स्टार्क नाबाद 33, तर नाथन लायन नाबाद 0 धावांवर खेळत आहे. अजूनही ऑस्ट्रेलियाच्या हाती दोन विकेट आहेत. त्यामुळे धावसंख्येत भर पडेल यात काही शंका नाही.

इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला. त्याने 3 विकेट घेतल्या. तर ब्रायडन कार्सने 2, विल जॅक्सने 2 आणि जोश टंगने 1 विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला तर मालिका खिशात घालेल. इतकंच काय तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेतील गुणतालिकेत अव्वल स्थान कायम ठेवेल. हा सामना ड्रॉ झाला तर ऑस्ट्रेलियाच्या विजयी टक्केवारीत मात्र घट होईल. विजयी टक्केवारी 100 वरन 88.89 होईल. हा सामना इंग्लंडने जिंकला तर ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी 83.33 टक्के होईल. मात्र पहिलं स्थान कायम राहिल. तकर इंग्लंडच्या विजयी टक्केवारीत किंचितशी वाढ होईल आणी 39.58 टक्के होईल आणि सातव्या स्थानीच राहील.