AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK सामन्यावरून व्यंकटेश प्रसाद यांनी ACC ला झापलं, ‘हा तर निव्वळ नालायकपणा’!

आशियाई क्रिकेट परिषदेने या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे यावरून मोठा वादंग झालेला दिसत आहे. टीम इंडियाच्या माजी खेळाडूने नालाकपणा असल्याचं म्हणत आशियाई क्रिकेट परिषदेवर निशाणा साधला आहे.

IND vs PAK सामन्यावरून व्यंकटेश प्रसाद यांनी ACC ला झापलं, 'हा तर निव्वळ नालायकपणा'!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 09, 2023 | 5:24 PM
Share

मुंबई : आशिया कप 2023  सुरू झाला टीम इंडियाचे दोनसामने झाले, यामधील एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. नेपाळविरूद्धचा सामना सोडला तर रोमांचक असं काही झालं नाही. त्यात पाऊस खोडा घालत असल्याने मॅचची लिंक तुटली की सर्व चाहत्यांचा मूड खराब होत आहे. आता परत एकदा भारत-पाक सामना होणार असून त्यावरही पावसाचं संकट आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे यावरून मोठा वादंग झालेला दिसत आहे. टीम इंडियाच्या माजी खेळाडूने नालाकपणा असल्याचं म्हणत आशियाई क्रिकेट परिषदेवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाला व्यंकटेश प्रसाद?

‘जर राखीव दिवस ठेवण्यात आला असेल तर तो पूर्णपणे निर्लज्ज आहे. कारण एकाच स्पर्धेतील संघांबाबत वेगवेगळे नियम का केले जात आहेत. अशा प्रकारे स्पर्धेचे आयोजन करणे पूर्णपणे अनैतिक असल्याचं व्यंकटेश प्रसाद यांनी म्हटलं आहे. व्यंकटेश प्रसाद यांनी केलेल्या वक्तल्यावर संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. याचाचा धागा पकडत चंडिका हथरुसिंघ यांनी टीका केली.

बांगलादेश संघाचे मुख्य कोच चंडिका हथरुसिंघ यांनीही भारत-पाक सामन्यासाठी ठेवण्यात आलेल्या राखीव दिवसावरून निशाणा साधला. भारत-पाक सामन्यासाठी राखीव दिवस ठेवणं योग्य नाही. स्पर्धेमध्ये मध्येच अशा प्रकारे नियम बदलले जातात. जर असा नियम बदलला जावू शकतो तर आमच्यासाठीही तो असावा, असं चंडिका हथरुसिंघ म्हणाले.

आशियाई क्रिकेट परिषदेचा नियम

पाकिस्तान यांच्यातील सामना 10 सप्टेंबर रोजी आरके स्टेडियम, कोलंबो, श्रीलंका येथे होणार आहे. प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान पावसामुळे त्या दिवशी संपूर्ण खेळ झाला नाही तर पहिल्या दिवशी जिथे संपला होता तिथून 11 सप्टेंबरला सामना पुन्हा सुरू होणार आहे.

आशिया कपसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (C), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (VC), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराज, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि प्रसिध कृष्णा

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट