PAK A vs IND A | राजवर्धन हंगरगेकर याचा ‘पंच’ आणि पाकिस्तान ढेर, टीम इंडियासमोर 206 धावांचं आव्हान

Asia Cup 2023 PAK A vs IND A | राजवर्धन हंगरगेकर याच्या जोरदार पंचमुळे पाकिस्तानचं 205 धावांवर पॅकअप झालंय.

PAK A vs IND A | राजवर्धन हंगरगेकर याचा पंच आणि पाकिस्तान ढेर, टीम इंडियासमोर  206 धावांचं आव्हान
| Updated on: Jul 19, 2023 | 7:23 PM

कोलंबो | पाकिस्तान ए क्रिकेट टीमने टीम इंडियाला विजयासाठी 206 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानला पूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही. पाकिस्तानचं 48 ओव्हरमध्येच 205 धावांवर पॅकअप झालं. टीम इंडियाच्या राजवर्धन हंगरगेकर यांने पाकिस्तानला जोरदार ‘पंच’ दिला. या पंचमुळे पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

टीम इंडियाला विजयासाठी 206 धावांची गरज

पाकिस्तानकडून कासिम अकरम याने सर्वाधिक 48 धावा केल्या. ओपनर साहिबजादा फरहान 35 रन्स करुन माघारी परतला. मुबासिर खान याने 28, हसीबुल्लाह खान 27, मेहरन मुमताज 25* रन्सची खेळी केली. कमरान घुलाम याने 15 आणि मोहम्मद हॅरीस याने 14 धावांची खेळी केली. या 7 जणांना सुरुवात मिळाली. मात्र भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना मोठी खेळी करण्यापासून रोखलं. दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर उर्वरित दोघांना दुहेरी आकडा करण्यात अपयश आलं.

राजवर्धन हंगरगेकर याचा ‘पंच’

टीम इंडियाकडून राजवर्धन हंगरगेकर याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. राजवर्धन याने 8 ओव्हरमध्ये 5.20 च्या इकॉनॉमीने 42 धावा देत या विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे राजवर्धन याने डबल विकेट मेडन ओव्हर टाकली. तसेच मानव सुथार याने 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर नितीश सिंधू आणि रियान पराग या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

वूमन्स टीम इंडिया विजयी

दरम्यान दुसऱ्या बाजूला वूमन्स टीम इंडियाने बांगलादेशवर 108 धावांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. जेमिमाह रॉड्रिगज्स हीने टीम इंडियासाठी ऑलराउंड कामिगिरी केली. जेमिमाह हीने आधी 8 बॉलमध्ये 9 फोरच्या मदतीने 86 रन्सची खेळी केली. तर त्यानंतर जेमिमाहने 3.1 ओव्हरमध्ये 3 रन्स देत 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली.

पाकिस्तान ए प्लेईंग इलेव्हन | मोहम्मद हरीस (कॅप्टन आणि विकेटकीपर), सॅम अयुब, हसीबुल्ला खान, कामरान गुलाम, साहिबजादा फरहान, ओमेर युसूफ, कासिम अक्रम, मुबासिर खान, मेहरान मुमताज, मोहम्मद वसीम जूनियर आणि शाहनवाज दहनी.

टीम इंडिया ए प्लेईंग इलेव्हन | यश धुल (कर्णधार), साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, निकिन जोस, रियान पराग, निशांत सिंधू, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), मानव सुथार, हर्षित राणा, नितीश रेड्डी आणि राजवर्धन हंगरगेकर.