
कोलंबो | आशिया कप 2023 मध्ये टीम इंडिया सुपर 4 मधील पहिला सामना हा 10 सप्टेंबरला खेळणार आहे. टीम इंडियात या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे. हा सामना श्रीलंकेतील कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल याचं कमबॅक झालं आहे. केएल याची आशिया कपसाठी निवड करण्यात आली. मात्र त्याला दुखापतीमुळे पाकिस्तान आणि नेपाळ विरुद्धच्या सामन्यात खेळता आलं नाही. मात्र आता तो पूर्णपणे फीट झालाय. केएलने नेट्समध्ये जोरदार सरावही केला. त्यामुळे केएल पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळणार असल्याचं समजलं जात आहे. त्यामुळे पाकिस्तान विरुद्ध प्लेईंग ईलेव्हनमधून ईशान किशन याचा पत्ता कट होणार असल्याचं निश्चित म्हटलं जातंय.
ईशान किशन याने केएल राहुल याच्या अनुपस्थितीत दोन्ही सामन्यात दमदार कामगिरी केली. ईशानने विकेटकीपिंगसह बॅटिंगही दमदार केली. ईशानने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात निर्णायक क्षणी 82 धावांची अर्धशतकी खेळी केली. या ई’शानदार’कामगिरीनंतरही त्याला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी टीममधून डच्चू मिळू शकतो.
आशिया कपमधील आपल्या पहिल्या सामन्यात खेळण्यासाठी केएल राहुल सज्ज झाला आहे. त्याआधी केएलने नेट्समध्ये जोरदार तयारी केली. बीसीसीआयने केएलचे सरावाचे फोटो ट्विट केले आहेत. केएल ओपनिंगलाही खेळू शकतो. तसेच पाचव्या स्थानीही बॅटिंग करु शकतो. त्यामुळे केएलला संधी मिळणार असल्याचं निश्चितच आहे.
केएल पाकिस्तान विरुद्ध सामन्यासाठी सज्ज
#TeamIndia had an indoor nets session at the NCC in Colombo today. 📸 #AsiaCup2023 pic.twitter.com/UhkB64L2Wp
— BCCI (@BCCI) September 7, 2023
आशिया कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर).