Asia Cup 2023 | रोहितसेना विरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानची प्लेईंग इलेव्हन जाहीर

Asia Cup 2023 Paksitan Playing 11 | पाकिस्तान क्रिकेट टीमने आशिया कप 2023 स्पर्धेतील रोहितसेना विरुद्धच्या सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे.

Asia Cup 2023 | रोहितसेना विरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानची प्लेईंग इलेव्हन जाहीर
| Updated on: Aug 29, 2023 | 10:13 PM

मुल्तान | बहुप्रतिक्षित आशिया कप 2023 स्पर्धेला अखेर उद्या 30 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. आशिया कप स्पर्धेचं आयोजन हे पाकिस्तान आणि श्रीलंका इथे संयुक्तरित्या करण्यात आलंय. या स्पर्धेत एकूण 13 सामने पार पडणार आहेत. त्यापैकी फक्त 4 सामनेच हेच पाकिस्तानमध्ये होणार आहेत. तर सर्वाधिक 9 मॅचेस श्रीलंका इथे आयोजित करण्यात आले आहेत. स्पर्धेत सहभागी होणारे 6 संघ हे 2 ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहेत. ए ग्रुपमध्ये नेपाळ, पाकिस्तान आणि टीम इंडिया आहे.

पाकिस्तानकडून प्लेईंग इलेव्हन जाहीर

आशिया कपमधील पहिलाच सामना हा ए ग्रुपचा असणार आहे. पाकिस्तानने रोहितसेना विरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे. पाकिस्तान क्रिकेट टीमने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. रोहितसेना विरुद्धच्या या पहिल्या सामन्यासाठी बाबर आझम पाकिस्तान क्रिकेट टीमचं कर्णधारपद सांभाळणार आहे. तर शादाब खान हा उपकर्णधार आहे.

पाकिस्तानची प्लेईंग इलेव्हन

पाकिस्तान विरुद्ध नेपाळ यांच्यात बुधवारी 30 ऑगस्टला आशिया कप 2023 पहिला सामना पार पडणार आहे. रोहित पौडेल हा नेपाळ क्रिकेट टीमची कर्णधारपद सांभाळणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे पाकिस्तानमधील मुल्तान क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. पाकिस्तानने सामन्याच्या काही तासांच्याआधीच प्लेईंग इलेव्हन जाहीर केल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

नेपाळ विरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, सलमान अली आघा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद नवाझ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि हरीस रौफ

आशिया कपसाठी नेपाळ टीम | रोहित पौडेल (कॅप्टन), आसिफ शेख, कुशल भुर्टेल, ललित राजबंशी, भीम सार्की, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंह ऐरी, संदीप लामिछाने, करण केसी, गुलशन झा, सोमपाल कामी, आरिफ शेख, प्रतीस जीसी, किशोर महतो, संदीप जोरा, अर्जुन सऊद आणि श्याम ढकाल.