AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup : 34 वर्षीय खेळाडूने शतक झळकावून रचला इतिहास, आशिया चषक स्पर्धेत पहिल्यांदाच असं घडलं

वुमन्स आशिया कप 2024 स्पर्धेचा उपांत्य फेरीसाठी लढत रंगतदार वळणावर पोहोचली आहे. अजूनही उपांत्य फेरीचं काही ठरलेलं नाही. पण अ गटातून भारत आणि ब गटातून श्रीलंकेचं उपांत्य फेरीचं जवळपास स्पष्ट झालं आहे. दरम्यान, श्रीलंका आणि मलेशिया यांच्या सामना पार पडला. हा सामना श्रीलंकेने जिंकला आणि एका विक्रमाची नोंदही झाली.

Asia Cup : 34 वर्षीय खेळाडूने शतक झळकावून रचला इतिहास, आशिया चषक स्पर्धेत पहिल्यांदाच असं घडलं
| Updated on: Jul 22, 2024 | 7:55 PM
Share

आशिया कप स्पर्धेत श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने 4 गडी गमवून 184 धावा केल्या आणि विजयासाठी 185 धावांचं आव्हान दिलं. मात्र मलेशियन संघ फक्त 40 धावा करू शकला. मलेशियाने 19.5 षटकं खेळून सर्वबाद 40 धावा केल्या. श्रीलंकेने हा सामना 144 धावांनी जिंकला.  श्रीलंकेकडून काव्या कविंदीने 2, इनोशी प्रियदर्शनीने 1, शशी निसानसालाने 3, सचिनी निसानसाला 1, अमा कांचना 1, कविशा दिलहरीने 2 गडी बाद केले.  या सामन्यात चमारी अटापट्टूची वादळी खेळी पाहायला मिळाली. चमारीने 69 चेंडूत नाबाद 119 धावांची खेळी केली. 34 वर्षीय चमारीने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी करत इतिहास रचला.या खेळीत तिने काही विक्रमांची नोंद केली. शतकी खेळीत तिने 14 चौकार आणि 7 षटकार मारले. यासह चमारी अटापट्टू टी20 महिला आशिया कपमध्ये शतक झळकावणारी पहिली फलंदाज ठरली.चमारीचे टी20 कारकिर्दीतील हे तिसरे शतक आहे. तसेच श्रीलंकेत पहिल्यांदाच महिला फलंदाजाने टी20 मध्ये शतक झळकावले.

चमारी अटापट्टूनेही या खेळीने स्वत:चाच विक्रम मोडीत काढला आहे. खरं तर, श्रीलंकेसाठी टी20 मध्ये कोणत्याही फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च खेळी आहे. यापूर्वीही हा विक्रम तिच्यात नावावर होता. यापूर्वी चमारी अटापट्टूने 113 धावांची इनिंग खेळून हा विक्रम केला होता. पण आता तिने 119 धावांची खेळी करत आपलाच विक्रम मोडला आहे. दुसरीकडे, चमारीने मिताली राज हीचा विक्रम मोडीत काढला आहे. मिताली राजने 2018 आशिया कपमध्ये मलेशियाविरुद्ध नाबाद 97 धावांची खेळी केली होती. श्रीलंकेच्या हर्षिता समरविक्रमाने थायलंडविरुद्ध आशिया कप 2022 मध्ये 81 धावांची खेळी केली होती.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

मलेशिया महिला (प्लेइंग इलेव्हन): विनिफ्रेड दुराईसिंगम (कर्णधार), वान ज्युलिया (विकेटकीप), एल्सा हंटर, माहिराह इज्जती इस्माईल, आइना हमीजाह हाशिम, आयना नजवा, अमलिन सोरफिना, सुआबिका मनिवन्नन, ऐस्या एलिसा, धनुश्री मुहुनान, नूर इज्जातुल सया.

श्रीलंका महिला (प्लेइंग इलेव्हन): विश्मी गुणरत्ने, चामारी अथापथु (कर्णधार), हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहरी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), अमा कांचना, इनोशी प्रियदर्शनी, काव्या कविंदी, सचिन निसानसाला, शशी निसानसाला, अमा कांचना

जरांगेंचे सरकारवर गंभीर आरोप अन् कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात मागणी काय?
जरांगेंचे सरकारवर गंभीर आरोप अन् कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात मागणी काय?.
हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस, नागपुरात धडकले दोन मोर्चे, मागण्या काय?
हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस, नागपुरात धडकले दोन मोर्चे, मागण्या काय?.
नवाब मलिक प्रकरणामुळे महायुती चर्चेत अडथळा, भाजपचा विरोध स्पष्ट
नवाब मलिक प्रकरणामुळे महायुती चर्चेत अडथळा, भाजपचा विरोध स्पष्ट.
हिवाळी अधिवेशन सुरूये की फॅशन शो... अंजली दमानिया यांचा संताप
हिवाळी अधिवेशन सुरूये की फॅशन शो... अंजली दमानिया यांचा संताप.
साहेबांनी आमचे खूप लाड केले, पंकजा मुंडेंकडून वडिलांच्या आठवणीना उजाळा
साहेबांनी आमचे खूप लाड केले, पंकजा मुंडेंकडून वडिलांच्या आठवणीना उजाळा.
एकनाथ शिंदेंचा थेट शरद पवार यांना फोन अन् दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
एकनाथ शिंदेंचा थेट शरद पवार यांना फोन अन् दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तोडगा निघाला... सर्व महापालिका मुहायुती एकत्र लढणार, बैठकीत काय ठरलं?
तोडगा निघाला... सर्व महापालिका मुहायुती एकत्र लढणार, बैठकीत काय ठरलं?.
आरशात पाहावं...उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपच्या बड्या नेत्याचं उत्तर
आरशात पाहावं...उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपच्या बड्या नेत्याचं उत्तर.
आता खुराक सुरु करू? दादांचं नेत्यांच्या त्या मागणीवर मिश्कील उत्तर
आता खुराक सुरु करू? दादांचं नेत्यांच्या त्या मागणीवर मिश्कील उत्तर.
काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन
काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन.