Asia Cup 2025 : भारताचे 6 खेळाडू गायब; team India मध्ये मोठ्या बदलाचे संकेत

India-Oman Match : टीम इंडिया आशिया कप 2025 मध्ये सध्या मजबूत स्थितीत आहे. आज भारताचा ओमान सोबत सामना आहे. पण या सामन्यात मोठ्या बदलाचे संकेत अगोदरच देण्यात आले आहेत. काय आहे हा मोठा बदल? कुणाला दिली विश्रांती?

Asia Cup 2025 : भारताचे 6 खेळाडू गायब; team India मध्ये मोठ्या बदलाचे संकेत
आशिया कप 2025
| Updated on: Sep 19, 2025 | 12:25 PM

Asia Cup 2025 team India reshuffle : आशिया कप 2025 मध्ये टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. 21 सप्टेंबर रोजी भारताचा पाकिस्तानशी सामना होत आहे. दुबई येथील आंतरराष्ट्रीय मैदानावर रात्री हा सामना होईल. या सामन्यापूर्वी भारताने एक मोठी खेळी खेळल्याचे दिसून येते. भारताची ही स्ट्रॅटर्जी पाकविरोधात यशस्वी ठरेल का? याचे उत्तर अर्थातच रविवारच्या पाकविरोधातील सामन्यानंतर समोर येईल. आज भारताचा ओमानसोबत सामना होत आहे. टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये मोठे बदल दिसत आहे. काय आहे हा मोठा बदल? कुणाला दिली विश्रांती?

टीम इंडियाचे 6 खेळाडू ‘गायब’

‘अ’ गटातील अखेरच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाने एक पर्यायी सराव सत्र आयोजीत केले होते. यामध्ये संघातील 9 खेळाडूने सहभाग घेतला. या सराव सत्रात जसप्रीत बुमराह, शिवम दुबे, संजू सॅमसन, शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा सारख्या मोठ्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला नाही. शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा हे पर्यायी सराव सत्रातही आवर्जून सहभागी होतात. पण यावेळी हे दोन्ही स्टार खेळाडू गायब दिसले.

तर दुसरीकडे ऑप्शनल प्रॅक्टिस सेशनमध्ये युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा याने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने गोलंदाजीच नाही तर फलंदाजीतही चमक दाखवली. त्याचा सराव पाहता त्याला ओमानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याला या मालिकेत अद्याप अजून एकदाही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे ओमानविरोधात राणा याला त्याची चमकदार कामगिरी दाखवण्याची मोठी संधी असेल. त्याचं सोनं झालं तर कदाचित पुढील सामन्यात तो स्थान पटकावेल.

या खेळाडूंनी गाळला घाम

या सरावा सत्रात भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याने घाम गाळला. भारताच्या सर्वात उत्साही आणि यशस्वी टी 20 आयमध्ये गोलंदाज अर्शदीप सिंह याला अद्याप संधी मिळालेली नाही. ओमान विरोधातील सामन्यात जसप्रीत बुमराह याला कदाचित आराम दिल्या जाऊ शकतो. तर अर्शदीप सिंह हे टीम इंडियात खेळू शकतो. तर फलंदाज रिंकू सिंह आणि जितेश शर्मा या खेळाडूंनी कसून सराव केला.

21 सप्टेंबर रोजी भारत-पाक पुन्हा आमने-सामने

आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ गट अ मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोन्ही संघात आता 21 सप्टेंबर रोजी, रविवारी दुबईतील आंतरराष्ट्रीय मैदानावर सामना होईल. हा सामना भारतीय वेळेनुसार, रात्री 8 वाजता सुरू होईल. गेल्या रविवारी भारताने आबुधाबीमध्ये पाकिस्तान संघाचा 7 गडी राखून मोठा पराभव केला होता.