
टीम इंडियाने आशिया कप 2025 स्पर्धेतील आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात केली. भारताने एकूण 40 षटकांचा खेळ अवघ्या 106 बॉलमध्येच संपवला. भारताने यूएईला 13.2 ओव्हरमध्ये ऑलआऊट केलं. त्यानंतर 3 फलंदाजांनीच भारताला सहज विजयी केलं. भारताने यूएईचं 57 रन्सवर पॅकअप केलं. टीम इंडियाच्या तिघांनी 58 धावांचं आव्हान फक्त 4.3 षटकांमध्ये पूर्ण करत जिंकवलं. भारताला हा सामना 10 विकेट्सने जिंकण्याची संधी होती. मात्र विजयासाठी 10 धावांची गरज असताना भारताने पहिली विकेट गमावली.
उपकर्णधार शुबमन गिल संजू सॅमसन अभिषेक शर्मा याच्यासह सलामीला आला. या सलामी जोडीने फटकेबाजीला सुरुवात केली. अभिषेक शर्मा याने पहिल्याच बॉलवर सिक्स ठोकला. अभिषेकने यासह इतिहास घडवला. अभिषेक टी 20i क्रिकेटमध्ये पहिल्याच बॉलवर सिक्स लगावणारा भारताचा चौथा फलंदाज ठरला. मात्र अभिषेक एका बाबतीत भारताचा पहिलावहिला फलंदाज ठरला.
अभिषेकने दुसऱ्या डावात यूएईचा डावखुरा फिरकीपटू हैदर अली याच्या बॉलिंगवर लाँग ऑनवरुन खणखणीत षटकार लगावला. अभिषेक यासह टी 20i मध्ये विजयी धावांचा पाठलाग करताना पहिल्याच चेंडूवर षटकार लगावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला.
भारतासाठी पहिल्या डावातील पहिल्या चेंडूवर एकूण तिघांनी सिक्स लगावण्याची कामगिरी केली आहे. या तिघांमध्ये रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसन यांचा समावेश आहे.
अभिषेक शर्मा याने यूएई विरुद्ध भारताला विजयी करण्यात बॅटिंगने प्रमुख भूमिका बजावली. भारताने 4.3 ओव्हरमध्ये 60 धावा केल्या. एकट्या अभिषेकने या 60 पैकी 30 धावा केल्या.अभिषेकने 16 बॉलमध्ये 187.50 च्या स्ट्राईक रेटने या 30 धावा केल्या. अभिषेकने या खेळीत एकूण 3 षटकार आणि 2 चौकार लगावले.
अभिषेक या खेळीनंतर स्फोटक मालामाल झाला. अभिषेकला या खास कामगिरीसाठी खास पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. अभिषेकला ‘सुपर सिक्सेस ऑफ द मॅच’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. अभिषेकला या 3 सिक्ससाठी 3 हजार अमेरिकी डॉलर म्हणजेच 2 लाख 60 हजार रुपयांचं बक्षिस देण्यात आलं.
अभिषेकची आशिया कप स्पर्धेत सिक्सने सुरुवात
6 & 4 off the first two balls by a Sharma – we’ve seen that before 😌🔥
Watch #DPWORLDASIACUP2025 – LIVE on #SonyLIV & #SonySportsNetwork TV Channels 📺#AsiaCup #INDvUAE pic.twitter.com/NdyGejW9zk
— Sony LIV (@SonyLIV) September 10, 2025
दरम्यान अभिषेक शर्मा याने गेल्या काही महिन्यात टीम इंडियासाठी सातत्याने स्फोटक खेळी केली आहे. अभिषेकने झिंबाब्वे विरुद्ध 2024 मध्ये टी 20I पदार्पण केलं होतं. तेव्हापासून अभिषेकने चमकदार कामगिरी करत भारतीय संघातील स्थान कायम केलं. आता अभिषेककडून पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात अशाच फटकेबाजीची आशा आहे.