बाबर आझमची पाकिस्तान संघात एन्ट्री? आशिया कप अंतिम सामन्यापूर्वी झालं असं की…

आशिया कप 2025 स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाशी निगडीत एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम टी20 संघात एन्ट्री करण्याची शक्यता आहे.

बाबर आझमची पाकिस्तान संघात एन्ट्री? आशिया कप अंतिम सामन्यापूर्वी झालं असं की...
बाबर आझमची पाकिस्तान संघात एन्ट्री? आशिया कप अंतिम सामन्यापूर्वी झालं असं की...
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Sep 27, 2025 | 8:28 PM

आशिया कप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही अंतिम फेरीत भिडणार आहेत.दुसरीकडे, 13 वर्षानंतर पाकिस्तान जेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. दुसरीकडे, भारताने पाकिस्तानला या स्पर्धेत दोनदा पराभूत केलं आहे. तसेच तिसऱ्यांदा पराभूत करण्यासाठी सज्ज आहे. जेतेपदावर नवव्यांदा नाव कोरण्याचा भारताचा दृढ निश्चय आहे. या स्पर्धेत भारतासमोर पाकिस्तानने अक्षरश: नांगी टाकली आहे. त्यामुळे पाकिस्तान संघावर चोहूबाजूने टीका होत आहे. असं असताना पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. बाबर आझमला या वर्षात एकही टी20 सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. कारण त्याचा स्ट्राईक रेट खूपच खराब आहे. तरीही त्याच्या नावाचा विचार केला जात आहे.

आशिया कप 2025 स्पर्धेत पाकिस्तानचे फलंदाज काही खास करू शकले नाहीत. भारताविरूद्धच्या दोन्ही सामन्यात पाकिस्तानी फलंदाज फेल गेले. त्यामुळे बाबर आझमची टी20 संघात एन्ट्री होऊ शकते. पाकिस्तानी मिडिया रिपोर्टनुसार, भारताने दोन सामन्यात पाकिस्तानचा पराभव केल्याने पीसीबी धावाधाव सुरु झाली आहे. पीसीबी अधिकाऱ्यांनी बाबर आझमला संघात स्थान देण्याचं ठरवलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आशिया कपसाठी युएईला पाठवण्याचा निर्णयही घेतला होता. पण आयोजकांनी स्पष्ट केलं की, जोपर्यंत कोणता खेळाडू जखमी होत नाही तोपर्यंत संघात बदल केला जाणार नाही. त्यामुळे बाबरचा टी20 संघातील प्रवेश लांबणीवर पडला. बाबर आझमची शेवटची निवड गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पाकिस्तानच्या टी20 संघात झाली होती.

बाबर आझमला टी20 वर्ल्डकपच्या दृष्टीने संघात स्थान देण्याचा विचार पक्का झाला आहे. त्यामुळे बाबर आझम दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत परतण्याची शक्यता आहे. ही मालिका ऑक्टोबरच्या अखेरीस जाईल. दक्षिण अफ्रिकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर येणार आहे. यावेळी दोन्ही संघात तीन सामन्यांची टी20 मालिका होईल. बाबर आझमला संघात स्थान मिळाल्यास तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर फलंदाजी करू शकतो. दुसरीकडे, मोहम्मद रिझवानला संधी मिळेल की नाही हे काहीच स्पष्ट नाही.