
क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा अवघ्या काही तासांनी संपणार आहे. टी 20 आशिया कप 2025 स्पर्धेतील हायव्होल्टेज सामन्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. आशिया कप 2025 स्पर्धेतील सहाव्या सामन्यात ए ग्रुपमधील 2 कट्टर संघ आमनेसामने असणार आहेत. पांरपरिक प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात रविवारी 14 सप्टेंबरला महामुकाबला होणार आहे. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील दुसरा सामना असणार आहे. दोन्ही संघांनी या मोहिमेत विजयी सुरुवात केली आहे. भारतीय संघाने 10 सप्टेंबरला सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात यूएई विरुद्ध आपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला. भारताने यूएईवर 9 विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर पाकिस्तानने 12 सप्टेंबरला ओमानवर मात केली. त्यानंतर आता दोन्ही संघांची टक्कर होणार आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार? हे सविस्तररित्या जाणून घेऊयात.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रविवारी 14 सप्टेंबरला होणार आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस करण्यात येणार आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
भारत विरुद्ध पाकिस्तान लाईव्ह मॅच मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे पाहायला मिळेल.
आशिया कप स्पर्धेतील पुढच्या फेरीत अर्थात सुपर 4 मध्ये पोहचण्यासाठी प्रत्येक संघाला साखळी फेरीतील 3 पैकी 2 सामने जिंकणं अनिर्वाय आहे. भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांनी सुपर 4 च्या हिशोबाने 50 टक्के काम पूर्ण केलं आहे. तर 50 टक्के काम बाकी आहे. रविवारी भारत-पाकिस्तान सामन्यातील विजयी संघ सुपर 4 साठी पात्र ठरेल. हा सामना जिंकून दोन्ही संघांकडे सुपर 4 मधील स्थान निश्चित करण्याची बरोबरीची संधी आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा या सामन्यात एकमेकांवर कुरघोडी करुन विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. या प्रयत्नात दोघांपैकी कोणत्या संघाला यश येणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.