
सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने शुक्रवारी 26 सप्टेंबर रोजी सुपर-4 मधील अखेरच्या सामन्यात श्रीलंकेला हरवले. भारताने सुरुवातीला फलंदाजी केली. 20 षटकात भारताने 202 धावांचा डोंगर उभारला. श्रीलंकेच्या संघाने सुद्धा भारताला कडवी झुंज दिली. पण त्यांना लक्ष्य गाठताना दमछाक झाली. सुपर ओव्हरमध्ये भारताने श्रीलंकेला पराभूत केले. या विजयासह भारतीय संघाने आशिया कप 2025 मध्ये विजयी घोडदौड कायम ठेवली. टीम इंडिया आशिया कप 2025 मध्ये आतापर्यंत एकही सामना हरली नाही. सुपर-4 मध्ये सुद्धा भारतीय संघाने विजयाचा आलेख उंचावला. गुणतालिकेत भारतीय संघाचा दबदबा स्पष्ट दिसला. आता उद्या पाकिस्तानला लोळवत भारताला (India-Pakistan Final Match) या विजयाचा जल्लोष करायचा आहे.
भारत नंबर 1
भारताने सुपर 4 मध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशानंतर श्रीलंकेचा पराभव केला आणि सर्व तीनही सामने जिंकले. टीम इंडियाशिवाय इतर कोणत्याही संघाला असा जलवा दाखवता आला नाही. गट अ मध्ये सुद्धा भारतीय संघाने विजय मिळवला. टीम इंडिया सुपर – 4 गुणतालिकेत सर्वात आघाडीवर आहे. टीम इंडियाचा पदतालिकेतील दबदबा दिसून आला. आशिया चषकात 6 गुणांसह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे. तर दोन सामने जिंकणारा पाकिस्तान गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानला भारताकडून दोनदा सपाटून मार खावा लागला. आता अंतिम सामन्यासाठी पुन्हा पाकिस्तानसोबत भारताचा सामना होणार आहे. आशिया कपमध्ये तिसऱ्यांदा दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
सर्वात वाईट नशीब श्रीलंकेच्या संघाचे म्हणावे लागेल. त्यांनी गटातील तीनही सामने जिंकले. पण पुढे सुपर -4 मध्ये या संघाला एकही सामना जिंकता आला नाही. बांगलादेशाविरोधात त्यांना पराभव पत्करावा लागला. मग भारतासोबतही त्यांना यशाचा सूर गवसला नाही. भारताला या संघाने कडवी झूंज दिली. पण त्याला यश आले नाही. हा संघ गुणतालिकेत सर्वात खाली पोहचला.
उद्या पाकिस्तानला लोळवण्याची संधी
उद्या भारताकडे पाकिस्तानला पुन्हा लोळवण्याची संधी चालून आली आहे. यापूर्वीच्या दोन सामन्यात पाक संघाला नामोहरम केले. आता अंतिम सामन्यात पाक संघाला त्याच्या गर्वासह लोळवा असा संताप भारतीय चाहत्यांचा आहे. मागील सामन्यात पाकिस्तानी संघ रडकुंडीला आल्यावर त्यांच्या खेळाडूंनी असभ्य वर्तन केले होते. इतकेच नाही तर या तीनपाट खेळाडूंच्या पत्नींनी ही भारताविरोधात विष ओकले. पहेलगाम हल्ल्यानंतर आशिया कपवर भारताने बहिष्कार घालण्याची मागणी होत होती. पण भारत नसला तर व्यावसायिक मोठे नुकसान होते. त्यामुळे हे सामने खेळवले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. गेल्या दोन सामन्यानंतर भारतात कुठेही मोठा जल्लोष दिसला नाही की गाजावाजा झाला असे नाही. गेल्या सामन्यावेळी भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळले होते.