IND vs OMAN : टीम इंडिया मोठा स्कोअर करण्यात फेल, चाहत्यांची निराशा, ओमानसमोर 189 रन्सचं टार्गेट, कोण जिंकणार?

India vs Oman 1st Innings : नवख्या ओमानने इंडियासारख्या दिग्गज टीमसमोर चिवट बॉलिंग केली. ओमानच्या गोलंदाजांनी भारताला 200 पार मजल मारण्यापासून रोखलं.

IND vs OMAN : टीम इंडिया मोठा स्कोअर करण्यात फेल, चाहत्यांची निराशा, ओमानसमोर 189 रन्सचं टार्गेट, कोण जिंकणार?
India vs Oman Sanju Samson
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Sep 19, 2025 | 10:40 PM

ओमानने आशिया कप 2025 स्पर्धेतील 12 व्या आणि आपल्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात टीम इंडियाला मोठी धावसंख्या करण्यापासून यशस्वीरित्या रोखलं आहे. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला होता.त्यामुळे चाहत्यांना या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांकडून फटकेबाजीची आशा होती. तसेच टीम इंडिया ओमान विरुद्ध किमान 250 पार मजल मारेल, अशी आशा होती. मात्र ओमानने चिवट बॉलिंग केली. त्यामुळे भारताला 200 पारही पोहचता आलं नाही. संजू सॅमसन याने केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे भारताला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 188 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे आता ओमान 189 धावांचा पाठलाग करताना कशी सुरुवात करतात? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

टीम इंडियाची बॅटिंग

भारताच्या चाहत्यांना शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीकडून स्फोटक सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र ओमानने दुसऱ्याच ओव्हरमध्ये भारताला पहिला झटका दिला. शाह फैसल याने शुबमनला 5 रन्सवर क्लिन बोल्ड केलं.त्यानंतर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 72 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर ओमानने भारताला आठव्या ओव्हरमध्ये 2 झटके दिले.

ओमानने आठव्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर अभिषेकला 38 रन्सवर आऊट केलं. तर तिसऱ्याच बॉलवर हार्दिक पंड्या रन आऊट झाला. त्यामुळे भारताची 3 आऊट 73 अशी स्थिती झाली. त्यानंतर अक्षर पटेल आणि संजू सॅमसन या दोघांनी 45 रन्स जोडल्या. त्यानंतर अक्षर पटेल 26 रन्सवर आऊट झाला. अक्षरनंतर शिवम दुबे 5 रन्स करुन माघारी परतला.

त्यानंतर ओमानने भारताला 2 ओव्हरमध्ये सलग 2 झटके दिले. ओमानने शिवमनंतर सेट संजू सॅमसन याला आऊट केलं. संजूने भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. संजूने 45 बॉलमध्ये 56 रन्स केल्या. तर तिलक वर्मा याने 29 धावांचं योगदान दिलं. तर अर्शदीप सिंह हार्दिक पंड्या प्रमाणे रन आऊट झाला. हर्षित राणा याने नाबाद 13 धावा केल्या. तर कुलदीप यादव याने 1 धाव जोडली. तर कॅप्टन सूर्यकुमार यादव अखेरपर्यंत बॅटिंगसाठी आला नाही. त्यामुळे चाहत्यांना सूर्याची बॅटिंग पाहायला मिळाली नाही.

ओमान टीम इंडियाला 188 धावांवर रोखण्यात यशस्वी

ओमानसाठी तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. शाह फैसल, जितेन रामानंदी आणि आमिर कलीम या तिघांनी भारताच्या प्रत्येकी 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. आता ओमानचे फलंदाज 189 धावांचा पाठलाग करताना कुठपर्यंत मजल मारतात? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.