AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : आशिया कप जिंकण्यासाठी भारताला 51 धावांची गरज, मोहम्मद सिराजकडून श्रीलंकेचा खुर्दा

IND vs SL : आशिया कपच्या फायनल सामन्यात भारताच्य गोलंदाजांनी श्रीलंका संघाचा धुव्वा उडवून टाकला आहेय. आशिया कप जिंकण्यासाठी भारताला 51 धावांची गरज आहे.

IND vs SL : आशिया कप जिंकण्यासाठी भारताला 51 धावांची गरज, मोहम्मद सिराजकडून श्रीलंकेचा खुर्दा
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 17, 2023 | 6:02 PM
Share

मुंबई : आशिया कपचा फायनल सामना श्रीलंका आणि भारतामध्ये सुरू आहे. टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रालंका संघाचा डाव अवघ्या 50 धावांवर आटोपला. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेच्या संघाने शरणागती पत्करली. मोहम्मद सिराज याच्या 6 विकेट आणि हार्दित पंड्याच्या 3 विकेट्सने श्रीलंकेचा डाव  50 धावांवर गडगडला. आशिया कपचा फायनल सामना सुरू आहे असं कुठेही वाटलं नाही. भारताला आशिय कप जिंकण्यासाठी 51 धावा करायच्या आहेत.

टॉस जिंकत श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय श्रीलंकेवरट उलटा पडल्याचं दिसलं. पाथुम निसांका आणि कुसल परेराा ओपनिंगला उतरले होते, जसप्रीत बुमराहने पहिल्याच ओव्हरमध्ये संघाला पहिली विकेट मिळवून दिली. बुमराहने नारळ फोडून दिल्यावर मोहम्मद सिराजे सुपारी घेतल्यासारखी त्याने बॉलिंग केली.

सिराजने पहिली ओव्हर मेडन टाकली त्यानंतर आपल्य दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने राडा केला.  सिराजने दुसऱ्या ओव्हरमध्ये एक दोन नाहीतर चार विकेट्स घेतल्या. गडी इतक्यावरत थांबला नाही पुढच्या ओव्हरमध्ये त्याने कर्णधार शनाकालाही बोल्ड करत आपल्या 5 विकेट्स पूर्ण केल्या. एकाच ओव्हरमध्ये चार विकेट घेणारा मोहम्मद सिराज पहिला खेळाडू ठरला आहे. इतकंच नाहीतर अवघ्या 16 बॉलमध्ये त्याने पाच विकेट घेतल्यात.

दरम्यान, भारताकडून मोहम्मद सिराज याने 6 विकेट्स, हार्दिक पंड्या 3 आणि जसप्रीत बुमराहने एक विकेट घेतली.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (Wk), इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (Wk), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका (C), दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथीशा पाथिराना

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?