
एसीसी मेन्स आशिया कप रायजिंग स्टार्स 2025 स्पर्धेतील 12 व्या सामन्यात श्रीलंका ए क्रिकेट टीमने बांगलादेशवर 6 धावांनी मात केली आहे. श्रीलंकेने बांगलादेशला विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र बांगलादेशला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 153 धावाच करता आल्या. श्रीलंकेने या विजयासह उपांत्य फेरीत धडक दिली. तर बांगलादेशने याआधीच उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं होतं. मात्र त्यानंतरही बांगलादेश साखळी फेरीतील आपला तिसरा आणि शेवटचा सामना जिंकण्यात अपयशी ठरली. तसेच या सामन्याच्या निकालासह उपांत्य फेरीतील 4 संघ निश्चित झाले.
बुधवारी 19 नोव्हेंबरला श्रीलंका विरुद्ध बांगलादेश आधी अफगाणिसान-हाँगकाँग यांच्यात सामना झाला. अफगाणिस्तानने हाँगकाँगवर 24 धावांनी मात केली. अफगाणिस्तानने यासह साखळी फेरीतील आपला एकूण दुसरा विजय मिळवला. अफगाणिस्तानने या विजयासह उपांत्य फेरीतील आव्हान कायम राखलं. मात्र बांगलादेश-श्रीलंका सामन्याच्या निकालावर अफगाणिस्तानचं उपांत्य फेरीतील समीकरण अवलंबून होतं. बांगलादेशने श्रीलंकेवर विजय मिळवला असता तर अफगाणिस्तान उपांत्य फेरीत पोहचला असता. मात्र श्रीलंकने आपल्या जोरावर 6 धावांनी विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत धडक दिली.
बांगलादेशने टॉस जिंकून श्रीलंकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. श्रीलंकेकडून सहान अर्चचिगे याने सर्वाधिक 69 धावांची खेळी केली. तर कॅप्टन दुनिथ वेल्लालागे याने 23 धावांचं योगदान दिलं. त्याव्यतिक्त एकालाही 20 पार पोहचता आलं नाही. श्रीलंकेने 7 विकेट्स गमावून 159 रन्स केल्या.
त्यानंतर बांगलादेशच्या पहिल्या 4 फलंदाजांना 160 या विजयी धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात मिळाली. मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजांनी त्यांना वेळेआधीच मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. हबीबुर सोहन याने 28 धावा केल्या. झवान अब्रार आणि अकबर अली या दोघांनी प्रत्येकी 25-25 धावा केल्या. यासिर अली आणि एमस मेहरुब या जोडीने शेवटच्या क्षणी विजयासाठी जोर लावला. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. बांगलादेशला 153 धावांपर्यंतच पोहचता आलं. श्रीलंकेसाठी कॅप्टन दुनिथ वेल्लालागे याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या.
श्रीलंका सेमी फायनलमध्ये
A clinical bowling effort in the second half has booked Sri Lanka ‘A’ a spot in the semi-finals of the #DPWorldAsiaCupRisingStars2025! 🇱🇰#DPWorldAsiaCupRisingStars2025 #SLvBAN #ACC pic.twitter.com/kYKv2LwgqS
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) November 19, 2025
दरम्यान सेमी फायनलसाठी 4 संघ निश्चित झाले आहेत. बी ग्रुपमधून पाकिस्तान आणि भारतीय क्रिकेट संघाने उपांत्य फेरीत धडक दिली आहे. तर ए ग्रुपमधून बांगलादेश आणि श्रीलंकेने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.