Asian Games 2023 | नेपाळ विरुद्धच्या सामन्यात अशी असू शकते टीम इंडियाची प्लेईंग ईलेव्हन

| Updated on: Oct 02, 2023 | 8:52 PM

Asian Games 2023 Team India Playing 11 Against Nepal | टीम इंडिया आशिया कप 2023 नंतर पहिल्यांदा आणि एकूण दुसऱ्यांदा नेपाळ विरुद्ध भिडणार आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळणार?

Asian Games 2023 | नेपाळ विरुद्धच्या सामन्यात अशी असू शकते टीम इंडियाची प्लेईंग ईलेव्हन
Follow us on

बिजिंग | एशियन गेम्स 2023 स्पर्धेत वूमन्स क्रिकेट टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात सुवर्ण पदक मिळवलं. आता मेन्स टीम इंडियाची वेळ आहे. टीम इंडिया थेट क्वार्टर फायनलमध्ये खेळणार आहे. टीम इंडियाचा हा पहिला सामना नेपाळ विरुद्ध होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर सकाळी 6 वाजता टॉस होणार आहे. ऋतुराज गायकवाड याच्याकडे टीम इंडियाचं कर्णधारपद आहे. या नेपाळ विरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या 11 खेळाडूंमध्ये कुणाला संधी मिळेल हे आपण जाणून घेऊयात.

ऋतुराज गायकवाड याच्यासमोर नेपाळ विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियात 11 जणांमध्ये कुणाला संधी द्यायची हे सर्वात मोठं आव्हान असणार आहे. कारण टीम इंडियात एकसेएक आणि तोडीसतोड खेळाडू आहेत. त्यामुळे या सामन्यात अंतिम 11 खेळाडूंमध्ये कुणाला संधी मिळेल, हे काही तासांनी स्पष्ट होईल. मात्र आपण संभावित टीम कशी असू शकते हे पाहुयात.

अशी असेल संभावित टीम इंडिया

ऋतुराज गायकवाड याच्यासोबत तिलक वर्मा आणि यशस्वी जयस्वाल या दोघांपैकी कुणीही ओपनिंगला येऊ शकतो. त्यामुळे आपल्यासोबत कुणाला ओपनिंगला घ्यायचं हे कॅप्टन ऋतुराज याला ठरवावं लागेल. तिलक वर्मा तिसऱ्या स्थानी येऊ शकतो. मधल्या फळीतील जबाबदारी ही राहुल त्रिपाठी याला मिळू शकते. प्रभासिमरन सिंह याला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. पाचव्या स्थानी प्रभासिमरन सिंह येऊ शकतो.

सहाव्या क्रमांकावर ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर असेल. सातव्या क्रमांकावर रिंकू सिंह असेल. रिंकूवर टीम इंडियाचा अखेरच्या क्षणी फटकेबाजी करुन फिनिशिंग टच देण्याची जबाबदारी असेल. रिंकू टी 20 स्पेशालिस्ट बॅट्समन आहे. त्यामुळे रिंकूच्या बॅटिंगवर सर्वांचंच लक्ष असेल.

बॉलिंगची जबाबदारी कुणावर?

फिरकीची जबाबदारी रवी बिश्नोई याच्याकडे असेल. तर वॉशिंग्टन सुंदर त्याला साथ देईल. तर अर्शदीप सिंह, आवेश खान आणि मुकेश कुमार या तिकडीवर वेगवान बॉलिंगची जबाबदारी असेल.

नेपाळ विरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाची संभावित प्लेईंग ईलेव्हन | ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, राहुल त्रिपाठी, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), वाशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, आवेश खान आणि मुकेश कुमार.