IND vs SA : गौतम गंभीर नाही तर खेळाडूंचं चुकलं! टीम इंडियाच्या प्रशिक्षकाचं खळबळ उडवणारं विधान

दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना भारताने गमावला. खरं तर या सामन्यात भारतीय संघ सहज जिंकेल अशी स्थिती होती. पण दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली. प्रशिक्षकपदी गौतम गंभीर विराजमान झाल्यानंतर भारताचा मायदेशात चौथा कसोटी पराभव आहे.

IND vs SA : गौतम गंभीर नाही तर खेळाडूंचं चुकलं! टीम इंडियाच्या प्रशिक्षकाचं खळबळ उडवणारं विधान
IND vs SA : गौतम गंभीर नाही तर खेळाडूंचं चुकलं! टीम इंडियाच्या प्रशिक्षकाचं खळबळ उडवणारं विधान
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 20, 2025 | 5:25 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जेतेपदाची स्वप्न उराशी बाळगणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाची स्थिती नाजूक आहे. खरं तर अंतिम फेरी गाठायची देशात होणाऱ्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी अपेक्षित आहे. पण भारतीय संघ देशात होणाऱ्या कसोटी मालिकेत पिछाडीवर जाताना दिसत आहे. खास फिरकीचा सामना करण्यासाठी प्रसिद्ध असलेले भारतीय फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकल्याचं दिसून आलं आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात 124 धावांचा सामना भारताला करता आला नाही. या पराभवानंतर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्यावर टीकेची झोड उठली. संघाचं प्रशिक्षकपद हाती घेतल्यानंतर हा चौथा कसोटी पराभव आहे. यापूर्वी न्यूझीलंडने 3-0 ने पराभूत केलं होतं. आता दक्षिण अफ्रिकेने पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे प्रशिक्षक गौतम गंभीरच्या रणनितीवर शंका उपस्थित केली जात आहे. असं असताना सहाय्यक प्रशिक्षक सितांशु कोटक गौतम गंभीरच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे.

गुवाहाटी कसोटी सामन्यापूर्वी सहाय्यक प्रशिक्षक सितांशु कोटक पत्रकार परिषदेला सामोरे गेलं. यावेळी त्याने भारतीय खेळाडूंवर पराभवाचं खापर फोडलं. सितांशु कोटक यांनी सांगितलं की, ‘सर्व जण गौतम गंभीर… गौतम गंभीर करत आहे. मी असं का सांगतोय कारण मी त्या स्टाफचा भाग आहे. त्यामुळे मला वाईट वाटतं. हे काही बरोबर नाही. काही लोकांचा हा अजेंडा असू शकतो. त्यांना शुभेच्छा. पण जे काय होत आहे ते चुकीचं आहे.’ सितांशु कोटक यांनी गौतम गंभीरची असं सांगत पाठराखण केली. इतकंच काय तर भारतीय खेळाडूंवर टीकेची झोड उठवली.

सितांशु कोटक यांनी सांगितलं की, ‘कोणीच असं बोलत नाही की फलंदाजांनी असं केलं. त्या गोलंदाजाने असं केलं किंवा फलंदाजीत आम्ही काही वेगळं करू शकतो.’ सितांशु कोटक यांनी दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी पराभवासाठी खेळाडूंना दोषी मानलं आहे. पण यापूर्वीही दिग्गज क्रिकेटपटूंनी प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली आहे. त्यानाही टीकेचं धनी व्हावं लागलं आहे. मग राहुल द्रविड असो की रवि शास्त्री, या दोघांवरही टीकेची झोल उठली आहे. इतकंच काय तर या दोघांवर टीका करण्यात गौतम गंभीरही आघाडीवर होता हे विसरून कसं चालेल, असं क्रीडाप्रेमी म्हणत आहेत.