Video | वयाच्या 65 व्या वर्षी कपिल देव यांचा मुलींसोबत झकास डान्स

| Updated on: Feb 27, 2024 | 3:10 PM

Kapil Dev | कपिल देव "गुलाबी आँखें जो तेरी देखीं शराबी ये दिल हो गया, सम्भालो मुझको ओ मेरे यारों…" या गाण्यावर कपिल डान्स करत आहे. हे गाणे आणि त्याचे म्युझीक सुरु असताना कपिल स्वत:ही गाणे म्हणतानाही दिसत आहे. कपिल देव यांनी आपले केसही चांगले वाढवल्याचे दिसत आहेत.

Video | वयाच्या 65 व्या वर्षी कपिल देव यांचा मुलींसोबत झकास डान्स
Follow us on

नवी दिल्ली, दि. 27 फेब्रुवारी 2024 | भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार आणि 1983 मध्ये भारतीय क्रिकेट संघाला विजेतेपद मिळवून देणारे कपिल देव 65 वर्षांचे झाले आहे. भारताला पहिले विश्वचषक मिळवून देणारे कपिल देव अष्टपैलू खेळाडू होते. वयाच्या 65 वर्षी कपिल देव फिट आहेत. त्याचा वयाचा अंदाज येत नाही. ते जीवनाचा पुरेपुर आनंद ते घेत असतात. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत कपिल देव मस्त डान्स करताना दिसत आहेत. मुलींबरोबर कपिल यांनी डान्स केला आहे.

कोणत्या गाण्यावर डान्स

कपिल देव “गुलाबी आँखें जो तेरी देखीं शराबी ये दिल हो गया, सम्भालो मुझको ओ मेरे यारों…” या गाण्यावर कपिल डान्स करत आहे. हे गाणे आणि त्याचे म्युझीक सुरु असताना कपिल स्वत:ही गाणे म्हणतानाही दिसत आहे. कपिल देव यांनी आपले केसही चांगले वाढवल्याचे दिसत आहेत. कपिल प्रमाणे भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनी यांनीही केस वाढवली आहे. यामुळे दोन्ही खेळाडूंच्या केसांची चर्चा होत आहे.

हे सुद्धा वाचा

कपिल देवची कामगिरी अशी होती

कपिल देव कर्णधार असताना त्या काळातील सर्वात मजबूत टीम असलेल्या वेस्ट इंडिज संघाचा 1983 मध्ये पराभव केला होता. वेस्ट इंडिजचा पराभव करुन भारत प्रथम विश्वचॅम्पियन बनला होता. कपिल देवने भारतीय क्रिकेटला नवीन सुरुवात करुन दिली होती. 1978 ते 1994 दरम्यान कपिल यांनी 131 कसोटी सामन्यात 8 शतक ठोकत 5248 धावा केल्या होत्या. तसेच कसोटी सामन्यात 434 विकेट घेतल्या होत्या. 225 वनडे मध्ये 3783 धावा करताना 253 विकेट घेतल्या होत्या. 1983 मधील विश्वचषकात झिम्बावे विरुद्ध खेळताना 175 धावा केल्या होत्या.

1983 च्या विश्वचषक स्पर्धेवर आधारित 83 हा चित्रपट आला आहे. कबीर खान यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट काही वर्षांपूर्वीच आला होता. क्रिकेटप्रेमींनी या चित्रपटाचे चांगलेच स्वागत केले होते.