AUS vs IND : युवा फलंदाजाची झुंजार खेळी, टीम इंडियाकडे 254 धावांची आघाडी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध जिकंणार?

Australia a vs India A Womens Only Test Day 3 Stmps Highlights : राघवी बिष्ट हीने केलेल्या चिवट आणि झुंजार खेळीमुळे भारताला दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 250 पेक्षा अधिक धावांची आघाडी घेता आली नाही.

AUS vs IND : युवा फलंदाजाची झुंजार खेळी, टीम इंडियाकडे 254 धावांची आघाडी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध जिकंणार?
Bcci Cricket
Image Credit source: TV9
| Updated on: Aug 23, 2025 | 5:21 PM

वूमन्स टीम इंडिया ए ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलिया ए वूमन्स विरुद्ध इंडिया ए वूमन्स यांच्यात टी 20 आणि वनडे सीरिज खेळवण्यात आली. ऑस्ट्रेलियाने भारताला टी 20 सीरिजमधील तिन्ही सामन्यात पराभूत केलं. त्यानंतर वूमन्स टीम इंडिया ए ने 3 सामन्यांची वनडे सीरिज 2-1 अशा फरकाने जिंकली. त्यानंतर आता वूमन्स ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध इंडिया वूमन्स ए यांच्यात 4 दिवसीय अनऑफिशियल टेस्ट मॅच खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने या सामन्यातील पहिल्या डावात 299 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 300 पार मजल मारली. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 305 धावांवर गुंडाळलं. ऑस्ट्रेलियाने यासह पहिल्या डावात 6 धावांची आघाडी घेतली.

त्यानंतर आता भारतासाठी राघवी बिष्ट, शफाली वर्मा आणि तेजल हसबनीस या तिघींनी कडक कामगिरी केली. या तिघींनी केलेल्या खेळीच्या जोरावर भारताने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 8 विकेट्स गमावून 260 धावा केल्या आहेत. भारताने अशाप्रकारे 254 धावांची आघाडी घेतली आहे.

भारताचा दुसरा डाव

शफाली वर्मा आणि नंदीनी कश्यप या सलामी जोडीने 42 धावांची भागीदारी केली. त्यानंतर नंदीनी 12 धावांवर बाद झाली. मात्र शफालीने घट्ट पाय रोवले. शफालीने फटकेबाजी करत अर्धशतक ठोकलं. शफालीने 58 बॉलमध्ये 52 रन्स केल्या. शफालीने या खेळीत 2 फोर आणि 2 सिक्स ठोकले.

धारा गुर्जर हीने 20 धावांचं योगदान दिलं. तर तेजल हसबनीस हीने 39 धावा केल्या. राघवी बिष्ट हीने सर्वाधिक धावा केल्या. राघवीने केलेल्या खेळीमुळे भारताला 250 पार मजल मारता आली. मात्र राघवीचं शतक हुकलं. राघवीने 119 बॉलमध्ये 13 फोरसह 86 रन्स केल्या. तर तनुश्री सरकार हीने 25 धावा केल्या. भारताने 8 विकेट्स गमावून 260 धावा केल्या आहेत. तर जोशिता व्हीजे आणि तितास साधू ही जोडी नाबाद परतली. जोशिताने 9 आणि तितासने 2 धावा केल्यात.

भारताच्या हातात आता 2 विकेट्स आहेत. त्यामुळे महिला ब्रिगेड चौथ्या दिवशी कांगारुंना किती धावांचं आव्हान देणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

राघवी बिष्टची झुंजार खेळी

टीम इंडियाची दुसऱ्या डावात 4 बाद 140 अशी स्थिती झाली होती. मात्र राघवीने चिवट खेळी करत भारताला अडचणीतून बाहेर काढलं. तर ऑस्ट्रेलियासाठी एमी लुईस एडगर हीने 4 विकेट्स घेतल्या. तसेच जॉर्जिया प्रेस्टविज हीने दोघींना बाद केलं.

कांगारुंना रोखलं

दरम्यान त्याआधी भारताने धारदार बॉलिंग करत कांगारुंना मोठी आघाडी घेण्यापासून रोखलं. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 305 धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी सियाना जिंजर हीने शतकी खेळी केली. सियानाने 103 धावांची खेळी केली. निकोले फाल्टम हीने 54 धावा केल्या. ताहलिया विल्सनने 49 धावांचं योगदान दिलं. ऑस्ट्रेलियाने अशाप्रकारे भारताच्या 299 चा पाठलाग करताना पहिल्या डावात 305 धावा केल्या.