AUS vs BAN Test: दुबळ्या बांगलादेशने ऑस्ट्रेलियाची उडवली दाणादाण, कांगारुंचा पहिला डाव 198 धावांवर आटोपला

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामन्यात बांगलादेशने बलाढ्य ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवून दिली. ऑस्ट्रेलियाचा डाव 198 धावांवर आटोपला.

AUS vs BAN Test: दुबळ्या बांगलादेशने ऑस्ट्रेलियाची उडवली दाणादाण, कांगारुंचा पहिला डाव 198 धावांवर आटोपला
AUS vs BAN Test: दुबळ्या बांगलादेशने ऑस्ट्रेलियाची उडवली दाणादाण, कांगारुंचा पहिला डाव 198 धावांवर आटोपला
Image Credit source: ICC Twitter
| Updated on: Aug 13, 2026 | 2:10 PM

बांगलादेशचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. बांगलादेशचा संघ कायम ऑस्ट्रेलियासाठी डोकेदुखी ठरला आहे. कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातील चित्र पाहून तसंच म्हणता येईल. कारण ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या 198 धावांवर आटोपला. तसेच बांगलादेशने पहिल्या दिवसअखेर एक गडी गमवून 96 धावांची खेळी केली आहे. अजूनही बांग्लादेश 102 धावांनी पिछाडीवर आहे. पण पहिल्या दिवसावर बांगलादेशने अधिराज्य गाजवलं. एक तर ही मालिका ऑस्ट्रेलियात होत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावात बांगलादेशसारख्या संघाने अशी स्थिती करावी, हे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का देणारं आहे. त्यात नाणेफेकीचा कौलही ऑस्ट्रेलियाने जिंकला होता आणि मनासारखा घेता आला होता. ऑस्ट्रेलियाने प्रथन फलंदाजी स्वीकारली, पण बांगलादेशचा संघ सरस ठरला.

ऑस्ट्रेलियाचा डाव आणि बांगलादेशची गोलंदाजी

ट्रॅव्हिस हेड आणि जेक वेदरॉल्ड यांनी ऑस्ट्रेलियाची सुरूवात केली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 45 धावा जोडल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया योग्य ट्रॅकवर आहे असं वाटलं होतं. पण त्यानंतर घसरगुंडी सुरू झाली ती थेट 198 धावांवर थांबली. जेक वेदरॉल्ड 23 धावा करून बाद झाला. त्यानंतर लगेचच ट्रेव्हिस हेडची विकेट पडली. हेड 22 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर मार्नस लाबुशेनही काही करू शकला नाही आणि 1 धाव करून खेळ आटोपला. पण एका बाजूने धडाधड विकेट पडत असताना अनुभव स्टीव्ह स्मिथने डाव सावरला. त्याने 71 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. कॅमरून ग्रीन 13, एलेक्स कॅरी 19, ब्यू वेबस्टर 12, पॅट कमिन्स 9, मिचेल स्टार्क 1, नाथन लायन 7 धावा करून बाद झाले.

बांगलादेशकडून हसन महमूदने भेदक गोलंदाजी केली. त्याने 17 षटकात 55 धावा दिल्या, पण 6 विकेट काढल्या. तर तास्किन अहमद आणि एबोदोत होसेन याने प्रत्येकी 2 गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 198 आटोपल्यानंतर बांगलादेशची काय स्थिती असेल याकडे लक्ष होते. पण बांगलादेशने सावध सुरूवात केली. शादमन इस्लाम आणि तन्झिद हसन तमीम यांनी पहिल्या विकेटसाठी 36 धावांची भागीदारी केली. शादमन इस्लाम 20 धावा करून बाद झाला. त्यानंतर तन्झिद आणि मोमिनुल हक यांची जोडी जमली. या जोडीने 60 धावांची भागीदारी केली. तसेच दुसऱ्या नाबाद होत तंबूत परतले. तन्झिद नाबाद 32 आणि मोमिनुल हक नाबाद 35 धावांवर खेळत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us