AUS vs ENG Ashes 2nd Test, Day 3: इंग्लंड बॅकफूटवर, ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड

| Updated on: Dec 18, 2021 | 5:30 PM

रुट बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या डावाला उतरती कळा लागली. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने भेदक मारा करत सर्वाधिक चार विकेट घेतल्या. नॅथन लेयॉनने तीन विकेट घेतल्या.

AUS vs ENG Ashes 2nd Test, Day 3: इंग्लंड बॅकफूटवर, ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड
Follow us on

मेलबर्न : अ‍ॅडलेड ओव्हल मैदानावर अ‍ॅशेस मालिकेतील (Ashes series) दुसरा कसोटी सामना सुरु आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून दिवसअखेरीस ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीमध्ये आहे. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या एक बाद 45 धावा झाल्या असून त्यांच्याकडे 282 धावांची आघाडी आहे. ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीमध्ये आहे. इंग्लंडसाठी परिस्थिती अधिक खडतर झाली आहे. त्यांचा पहिला डाव 236 धावात आटोपला.

इंग्लंडंकडून डेविड मलान आणि जो रुट यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी निराशा केली. बेन स्टोक्स (34) आणि ख्रिस वोक्स (24) यांनी थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मलानने सर्वाधिक (80) आणि रुटने (62) धावा केल्या. दोघांनी दोन बाद 17 वरुन सकाळी डाव पुढे सुरु केल्यानंतर आश्वासक फलंदाजी केली. तिसऱ्या विकेटसाठी त्यांनी 138 धावांची भागीदारी केली.

रुट बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या डावाला उतरती कळा लागली. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने भेदक मारा करत सर्वाधिक चार विकेट घेतल्या. नॅथन लेयॉनने तीन विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात सलामीवर डेविड वॉर्नर 13 धावांवर स्वस्तात रनआऊट झाला. हॅरिस आणि नेसार खेळपट्टीवर आहेत. ऑस्ट्रेलिया उद्या वेगाने धावा करुन इंग्लंडला फलंदाजीची संधी देईल. अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंड 1-0 ने पिछाडीवर आहे.

रुटने तेंडुलकर-गावस्करांना टाकलं मागे
इंग्लिश कॅप्टन जो रुटचं (Joe root) कसोटी क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन सुरु आहे. कसोटी सामने खेळताना रुटच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. शनिवारी अ‍ॅडलेड ओव्हलच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना रुटने भारताचे महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin tendulkar) आणि सुनील गावस्कर (Sunil gavaskar) यांचा एकवर्षात सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम मोडला. अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंड-ऑस्ट्रेलियामध्ये (England vs Australia) दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान रुटने ही कामगिरी केली.

संबंधित बातम्या :

Ind vs SA: रोहितच्या जागी उपकर्णधार कोण? प्रश्नाचं उत्तर मिळालं, ‘या’ खेळाडूवर सोपवली जबाबदारी
IND vs SA: द्रविड-विराटच्या टीममध्ये झाला जोरदार सामना, दक्षिण आफ्रिकेत दिसला ‘चक दे इंडिया’चा सीन
न्यूझीलंडच्या 34 वर्षाच्या गोलंदाजाचा कहर, प्रतिस्पर्धी संघाची सपशेल शरणागती