AUS vs ENG, Ashes 2nd Test, Day 5: ऑस्ट्रेलिया विजयाच्या दिशेने, इंग्लंडचा डाव गडगडला

यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर (Australia vs England) विजयासाठी 468 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. कालच दिवसअखेरीस इंग्लंडची स्थिती खराब झाली होती.

AUS vs ENG, Ashes 2nd Test, Day 5: ऑस्ट्रेलिया विजयाच्या दिशेने, इंग्लंडचा डाव गडगडला
| Edited By: | Updated on: Dec 20, 2021 | 10:42 AM

अ‍ॅडलेड: अ‍ॅशेस मालिकेत (Ashes series) दुसऱ्या कसोटी विजयाच्या दिशेने ऑस्ट्रेलियाची वाटचाल सुरु आहे. अ‍ॅडलेड (Adelaide Test) येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यातला आजचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर (Australia vs England) विजयासाठी 468 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. कालच दिवसअखेरीस इंग्लंडची स्थिती खराब झाली होती. आज सकाळी डावाला सुरुवात केल्यानंतर इंग्लंडला ओली पोपच्या (4) रुपाने पहिला धक्का बसला.

त्यानंतर बेन स्टोक्सला (12) धावांवर लेयॉनने पायचीत पकडले. इंग्लंडच्या सहा विकेट गेल्या असून ऑस्ट्रेलिया विजयापासून फक्त चार पावलं दूर आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रुट आणि डेविड मलान यांच्यासारखे फॉर्ममध्ये असलेले फलंदाज काल स्वस्तात बाद झाले.

ऑस्ट्रेलियाने काल एक बाद 45 वरुन डाव पुढे सुरु केल्यानंतर दुसऱ्या डावात नऊ विकेट गमावून 230 धावांवर डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात मार्नस लाबुशेन आणि ट्रेविड हेडने अर्धशतकी खेळी केली.

इंग्लंडचे दोन्ही सलामीवर रोरी बर्न्स (34) आणि हासीब हमीद (०) तंबूत परतले. अ‍ॅशेस मालिकेतील पहिली कसोटी आधीच इंग्लंडने गमावली आहे. मालिकेत ते 1-0 ने पिछाडीवर आहेत. मालिकेतील हा दुसरा कसोटी सामना आहे. इंग्लंडचा पहिला डाव 236 धावात आटोपला.