
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेचे क्रिकेट चाहत्यांना वेध लागले आहेत. उभयसंघातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला येत्या 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना हा कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये होणार आहे. तर 21 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड या 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये प्रतिष्ठेच्या एशेस सीरिजचा थरार रंगणार आहे. यंदा ही मालिका ऑस्ट्रेलियात होणार आहे. या 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हा पर्थमध्ये होणार आहे. मात्र त्याआधी यजमान ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा आणखी एका खेळाडू दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढली आहे.
ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचं स्पष्ट होतं. त्यानंतर आता पहिल्या सामन्याला अवघे काही दिवस बाकी आहेत. अशात आता आणखी एक खेळाडू पहिल्या टेस्टमधून बाहेर झाला आहे. दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज शॉन एबट याला पर्थ टेस्टला मुकावं लागलं आहे. पर्थमधील ऑप्टस स्टेडियममध्ये 21 नोव्हेंबरपासून पहिला सामना होणार आहे. पॅट कमिन्स नसल्याने त्याचा परिणाम बॉलिंगवर होणार आहे. त्याता आता शॉन नसल्याने ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंग लाईनवर मोठा परिणाम जाणवणार आहे.
ऑस्ट्रेलिया मायदेशात टीम इंडिया विरुद्ध वनडे आणि टी 20i मालिका खेळली. आगामी एशेस सीरिजच्या पार्श्वभूमीवर टीम मॅनेजमेंटने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना टी 20i मालिकेतून मुक्त केलं. त्यानंतर हे खेळाडूने देशांतर्गत क्रिकेटमधील शेफील्ड शील्ड स्पर्धेत सहभागी झाले. शॉन आणि जोश हेझलवूड हे दोघेही शेफील्ड शील्ड स्पर्धेत न्यू साऊथ वेल्सचं प्रतिनिधित्व करत आहेत. शॉन आणि जोश हेझलवूड या दोघांना या स्पर्धेतील सामन्यातील तिसऱ्या दिवशी बॉलिंग करताना हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे दोघांच्या रुग्णालयात आवश्यक टेस्ट करण्यात आल्या.
तपासणी आणि आवश्यक टेस्ट केल्यानंतर जोश हेझलवूड याची दुखापत गंभीर नसल्याचं स्पष्ट झालं. तसेच जोशला पहिल्या कसोटीसाठी फिट असल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यामुळे टीम मॅनजमेंटला मोठा दिलासा मिळाला. मात्र शॉनला झालेली दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे शॉनला पहिल्या कसोटीतून बाहेर व्हावं लागलंय. आयसीसीने याबाबतची माहिती एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन दिली आहे.
आता शॉनच्या जागी ऑस्ट्रेलिया संघात कुणाला संधी दिलीय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र शॉनच्या जागी अद्याप कुणाचाही समावेश करण्यात आलेला नाही. तर पॅट कमिन्स याच्या जागी प्लेइंग ईलेव्हनमध्ये स्कॉट बोलँड याचा समावेश केला जाऊ शकतो.