AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : टीम इंडियात मोठी उलथापालथ, कर्णधारासह ओपनिंग जोडी बदलणार!

Australia vs India 1st Perth Test : टीम इंडियाची पर्थ कसोटीत खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. टीम इंडियाच्या 2 खेळाडूंमुळे संघात उलथापालथ पाहायला मिळणार आहे.

IND vs AUS : टीम इंडियात मोठी उलथापालथ, कर्णधारासह ओपनिंग जोडी बदलणार!
Image Credit source: BCCI
| Updated on: Nov 17, 2024 | 11:03 PM
Share

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. हा सलामीचा सामना पर्थ येथे होणार आहे. टीम इंडियाची या मालिकेत खऱ्या अर्थाने ‘कसोटी’ लागणार आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा हा पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नाही. तर शुबमन गिल याला दुखापत झाली आहे. अशात यशस्वी जयस्वाल याच्यासह ओपनिंग कोण करणार? तिसऱ्या स्थानी बॅटिंगला कोण येणार? तर बॉलिंगमध्ये जसप्रीत बुमराहला कोण साथ देणार? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. आता या प्रश्नांवर कॅप्टन जसप्रीत बुमराह आणि हेड कोच गौतम गंभीर यांना तोडगा काढावा लागणार आहे.

नवा कर्णधार

रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितीका यांना मुलगा झालाय. त्यामुळे रोहित आणखी काही दिवस कुटुंबियासह वेळ घालवणार आहे. त्यामुळे रोहित पर्थ कसोटीसाठी उपलब्ध नसणार हे स्पष्ट झालं आहे. रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह नेतृत्व सांभाळणार आहे.

सलामी जोडी

रोहित नसल्याने कॅप्टन्सीसह ओपनिंग जोडीमध्येही बदल मिळणार आहे. ओपनर यशस्वी जयस्वाल याला केएल राहुल किंवा अभिमन्यू इश्वरन याची साथ मिळू शकते. दोघांपैकी केएल राहुल याची निवड केली जाऊ शकते.

तिसऱ्या स्थानी कोण?

शुबमन गिल तिसऱ्या स्थानी खेळतो. मात्र त्याला दुखापत झालीय. त्यामुळे शुबमनच्या जागी कोण खेळणार? हा मोठा प्रश्न आहे. अशात शुबमनच्या जागी ध्रुव जुरे याला संधी दिली जाऊ शकते. तसेच विराट कोहली याला सुद्धा प्रमोट केलं जाऊ शकतं. विराट न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये तिसऱ्या स्थानी खेळला होता. देवदत्त पडीक्कल यालाही ऑस्ट्रेलियात थांबवलंय. त्यामुळे देवदत्तही या तिसर्‍या स्थानासाठी दावेदार आहे.

बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल

नियमित कॅप्टन आणि वनडाऊन खेळाडू नसल्याने टीम इंडियाच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल होणार हे निश्चित आहे. टॉप 3 मध्ये बदल पाहायला मिळणार आहे. तसेच पाचव्या आणि सहाव्या स्थानी सर्फराज खान याच्या जागी दुसर्‍या कुणाला पाठवलं जाऊ शकतं.

दोघांचं पदार्पण

दरम्यान पहिल्या कसोटीतून टीम इंडियासाठी ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी आणि वेगवान गोलंदाज हर्षित राणा या दोघांना पदार्पणाची संधी मिळू शकते.

पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल स्टार्क, ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ, एलेक्स कॅरी, मार्नस लाबुशेन, स्कॉट बोलँड, नॅथन लायन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्विनी, जॉश इंग्लीश आणि जॉश हेझलवुड

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.