IND vs AUS: टी 20I सीरिजमधून स्टार ओपनर आऊट, निर्णायक क्षणी टीमला झटका, ओपनिंग जोडी बदलणार

Australia vs India T20i Series : टीम इंडियाने रविवारी 2 नोव्हेंबरला तिसऱ्या टी 20i विजय मिळवला. भारताने यासह मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. त्यानंतर आता उर्वरित मालिकेतून स्टार ओपनरला बाहेर व्हावं लागलं आहे.

IND vs AUS: टी 20I सीरिजमधून स्टार ओपनर आऊट, निर्णायक क्षणी टीमला झटका, ओपनिंग जोडी बदलणार
Australia vs India T20i Series Suryakumar Yadav
Image Credit source: Bcci
| Updated on: Nov 03, 2025 | 5:45 PM

टीम इंडियाने रविवारी 2 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियावर तिसऱ्या टी 20i सामन्यात विजय मिळवून मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. होबार्टमध्ये झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 187 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान 9 बॉलआधी 5 विकेट्स राखून पूर्ण केलं. भारताने 18.3 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 188 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर आणि जितेश शर्मा या जोडीने अखेरच्या क्षणी सहाव्या विकेटसाठी केलेल्या भागीदारीच्या जोरावर भारताने हा विजय साकारला. दोघांनी 25 बॉलमध्ये 43 रन्सची पार्टनरशीप करत भारताला विजयी केलं. सुंदरने 23 बॉलमध्ये नॉट आऊट 49 रन्स केल्या. तर जितेशने 22 रन्स केल्या.

त्यानंतर टीम इंडियातून फिरकीपटू कुलदीप यादव याला उर्वरित मालिकेतून मुक्त करण्यात आलं. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. त्याआधी ऋषभ पंत याच्या नेतृत्वात इंडिया ए दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध 2 मॅचची अनऑफिशीयल टेस्ट सीरिज खेळत आहे. या सीरिजमधील दुसऱ्या सामन्यासाठी कुलदीपला मुक्त करण्यात आलं आहे. त्यानंतर आता एका खेळाडूला उर्वरित मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे.

हेड टी 20i सीरिजमधून आऊट

ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक सलामीवीर फलंदाज ट्रेव्हीस हेड याला उर्वरित टी 20i मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. आगामी एशेस सीरिजच्या पार्श्वभूमीवर हेडला बाहेर करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियासाठी इंग्लंड विरुद्ध होणारी एशेस सीरिज फार महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे हेडला बाहेर करण्यात आलं आहे. हेडआधी जोश हेझलवूड याला पहिल्या 2 टी 20i सामन्यांनंतर मालिकेतून विश्रांती देण्यात आली.

हेडची कामगिरी

हेडला या टी 20i मालिकेतील संपूर्ण 5 सामन्यांसाठी संधी देण्यात आली होती. पहिला सामना पावसामुळे वाया गेला. हेडने दुसऱ्या सामन्यात 28 रन्स केल्या. तर तिसऱ्या सामन्यात हेडला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. हेडने 6 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाचे खेळाडू एशेस सीरिजआधी शेफील्ड शील्ड स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. या स्पर्धेत हेड व्यतिरिक्त जोश हेझलवडू आणि सीन एबट हे दोघे खेळताना दिसणार आहेत.

दरम्यान इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील एशेस सीरिजचा थरार 21 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीचा भाग असणार आहे.

एशेस सीरिजचं वेळापत्रक

पहिला सामना, 21 ते 25 नोव्हेंबर, पर्थ

दुसरा सामना, 4 ते डिसेंबर, ब्रिस्बेन

तिसरा सामना, 17 ते 21 डिसेंबर, एडलेड

चौथा सामना, 26 ते 30 डिसेंबर, मेलबर्न

पाचवा आणि अंतिम सामना, 4 ते 8 जानेवारी, सिडनी