AUS vs WI | ग्लेन मॅक्सवेल याचं वादळी शतक, रोहित शर्माच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

Glenn Maxwell 5th T20I Cetury | ग्लेन मॅक्सवेल याने वेस्ट इंडिज विरुद्ध नाबाद शतकी खेळी केली आहे. मॅक्सवेलने या शतकासह टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

AUS vs WI | ग्लेन मॅक्सवेल याचं वादळी शतक, रोहित शर्माच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
| Updated on: Feb 11, 2024 | 4:04 PM

एडलेड | ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्यात क्रिकेट चाहत्यांना वादळी खेळी पाहायला मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाला वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये अफगाणिस्तान विरुद्ध नाबाद द्विशतक ठोकून विजय मिळवून देणाऱ्या ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल याने पुन्हा एकदा धमाका केला आहे. मॅक्सवेल याने वेस्ट इंडिज विरुद्ध दुसऱ्या टी 20 सामन्यात खणखणीत शतक ठोकलं आहे. मॅक्सवेल याने या शतकासह मोठा कारनामा केला आहे.

मॅक्सवेल याने अवघ्या 50 बॉलमध्ये हे शतक ठोकलं. मॅक्सवेलच्या टी 20 कारकीर्दीतील हे पाचवं शतक ठरलंय. मॅक्सवेलने यासह रोहित शर्माच्या सर्वाधिक टी 20 शतकांची बरोबरी केली आहे. रोहितने काही महिन्यांआधी झालेल्या टी 20 मालिकेत अफगाणिस्तान विरुद्ध पाचवं शतक ठोकलं होतं. विशेष बाब म्हणजे मॅक्सवेलने रोहितच्या तुलनेत 50 डावांआधी 5 शतकं पूर्ण केली आहेत. रोहितने 143 डावांमध्ये 5 शतकं केली आहेत. तर मॅक्सवेलने 94 व्या डावातच हा कारनामा केला.

दरम्यान मॅक्सवेल याने विंडिज विरुद्ध 55 बॉलमध्ये 12 चौकार आणि 8 सिक्ससह 218.18 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 120 धावांची खेळी केली. मॅक्सवेलच्या या तुफानी शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 241 धावा केल्या. त्यामुळे आता विंडिजसमोर 242 धावांचं आव्हान असणार आहे.

विंडिजसाठी ‘करो या मरो’

दरम्यान ऑस्ट्रेलिया या 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाने पहिला सामना हा 11 धावांनी जिंकत मालिकेत आघाडी घेतली होती. त्यामुळे वेस्ट इंडिजला मालिकेतील आव्हान कायम राखायचं असेल, तर हा दुसरा सामना जिंकावाच लागणार आहे. त्यामुळे आता विंडिज 242 धावांचा पाठलाग कशाप्रकारे करते, याकडे लक्ष असणार आहे.

ग्लेन मॅक्सवेल याचा शतकांचा पंजा

ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | मिचेल मार्श (कॅप्टन), डेव्हीड वॉर्नर, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), ॲडम झाम्पा, स्पेन्सर जॉन्सन, जेसन बेहरनडॉर्फ आणि जोश हेझलवूड.

वेस्ट इंडिज प्लेईंग ईलेव्हन | रोव्हमन पॉवेल (कर्णधार), ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), शाई होप, शेरफेन रदरफोर्ड, आंद्रे रसेल, जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अकेल होसेन आणि अल्झारी जोसेफ.