Cricket : आयपीएलदरम्यान वार्षिक करार जाहीर, या 3 खेळाडूंना लॉटरी, कुणाचा समावेश?

Cricket australia Central contract list : क्रिकेट बोर्डाने वार्षिक कराराची घोषणा केली आहे. या वार्षिक करारात एकूण 23 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहेत. तसेच 3 खेळाडूंना पहिल्यांदाच संधी मिळाली आहे.

Cricket : आयपीएलदरम्यान वार्षिक करार जाहीर, या 3 खेळाडूंना लॉटरी, कुणाचा समावेश?
Jasprit Bumrah IND vs AUS
Image Credit source: Icc X Account
| Updated on: Apr 01, 2025 | 6:32 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसमात आतापर्यंत एकूण 12 सामने खेळवण्यात आले आहेत. साऱ्या क्रिकेट विश्वाचं सध्या आयपीएल स्पर्धेकडे लक्ष लागून आहेत. या स्पर्धेत विविध संघातील खेळाडू खेळत आहेत. त्यामुळे साऱ्या विश्वातून क्रिकेट चाहत्यांकडून आयपीएल सामने पाहिले जात आहेत. अशात मोठी बातमी समोर आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वार्षिक कराराची घोषणा केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या वार्षिक करारात एकूण 23 खेळाडूंचा समावेश केला आहे. तसेच 3 खेळाडूंना लॉटरी लागली आहे. या तिघांचा पहिल्यांदाच वार्षिक करारात समावेश करण्यात आला आहे. टीम इंडिया विरुद्ध 26 डिसेंबरला कसोटी क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या सॅम कॉनस्टाससह एकूण तिघांना पहिल्यांदा वार्षिक करारात स्थान मिळालं आहे. कॉनस्टासने कसोटी पदार्पणात टीम इंडियाविरुद्ध 60 आणि 8 धावा केल्या होत्या.

वार्षिक करारात 23 खेळाडू

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 1 एप्रिल रोजी वार्षिक करार जाहीर केला आहे. सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे. सॅम कोनस्टास, मॅट कुहनमॅन आणि ब्यू वेबस्टर या तिघांना पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या तिघांचं पहिल्यांदाच वार्षिक करारात स्थान मिळाल्याने अभिनंदन केलं. मॅटने 2022 साली आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. मॅटने श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेत शानदार कामगिरी केली होती. मॅटने 2 कसोटी सामन्यांत 16 विकेट्स घेतल्या. तसेच ब्यू वेबस्टरने अवघ्या काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. ब्यूने 3 कसोटींमध्ये 150 धावांसह 3 विकेट्सही घेतल्या आहेत.

आयपीएलच्या 18 व्या मोसमात 7 खेळाडू

दरम्यान आयपीएलच्या 18 व्या मोसमात ऑस्ट्रेलियाचे 7 खेळाडू खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादचं नेतृत्व करत आहेत. जोश हेझलवूड याला दुखापतीमुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत खेळता आलं नव्हतं. मात्र जोश आयपीएलच्या या मोसमात खेळत आहेत. जोश आरसीबीचं प्रतिनिधित्व करत आहे. तसेच ट्रेव्हिस हेड (सनरायजर्स हैदराबाद), मिचेल मार्श (लखनौ सुपर जायंट्स), ग्लेन मॅक्सवेल (पंजाब किंग्स), मिचेल स्टार्क (दिल्ली कॅपिट्ल्स) आणि एडम झॅम्पा (सनरायजर्स हैदराबाद) खेळत आहे.

वार्षिक करार जााहीर

वार्षिक करारात स्थान मिळवणारे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू : पॅट कमिंस, झेव्हियर बार्टलेट,स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमरुन ग्रीन, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कॉनस्टास, मॅथ्यू कुहनेमन, मार्नस लबुशेन, नथन लियोन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, लान्स मॉरिस, झाय रिचर्डसन, मॅट शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, ब्यू वेबस्टर आणि एडम झॅम्पा.