INDvAUS | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

| Updated on: Jan 14, 2023 | 12:00 AM

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांसाठी भारतीय संघांची घोषणा केली आहे.

INDvAUS | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
Follow us on

मुंबई : बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. रोहित शर्मा या कसोटी मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. विशेष म्हणजे कसोटी संघात सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांची पहिल्यांदा निवड करण्यात आली आहे. तसेच दुखापतग्रस्त असलेल्या रवींद्र जाडेजाचाही समावेश केला गेला आहे.

ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया टीम इंडिया विरुद्ध 4 कसोटी सामन्यांची मालिका आणि 3 मॅचची वनडे सीरिज खेळवण्यात येणार आहे. यापैकी कसोटी मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांसाठीच टीम इंडियाचा संघ जाहीर झाला आहे.

दरम्यान यासोबतच न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेसाठीही भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेतही विराट कोहली आणि रोहित शर्माचा समावेश करण्यात आलेला नाही. तर मुंबईकर पृथ्वी शॉची एन्ट्री झाली आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करेल. तर टी 20 मालिकेत हार्दिक पांड्याकडे कर्णधारपदाची सूत्रं देण्यात आली आहेत.

हे सुद्धा वाचा

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिली कसोटी, 9-13 फेब्रुवारी, नागपूर

दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, नवी दिल्ली

तिसरी कसोटी, 1-5 मार्च, धर्मशाळा

चौथी कसोटी, 9-13 मार्च, अहमदाबाद

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक.

न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया

हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड़, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ आणि मुकेश कुमार.