AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs SA: डबल सेंच्युरीनंतर पत्नीच्या डोळ्यात अश्रू, David Warner ने हजारो लोकांसमोर असं केलं KISS, VIDEO

AUS vs SA: डेविड वॉर्नरसाठी आजचा दिवस खास आहे. 3 वर्षानंतर तो अशी लाजवाब इनिंग खेळला.

AUS vs SA: डबल सेंच्युरीनंतर पत्नीच्या डोळ्यात अश्रू, David Warner ने हजारो लोकांसमोर असं केलं KISS, VIDEO
David warner with WifeImage Credit source: instagram
| Updated on: Dec 27, 2022 | 3:53 PM
Share

मेलबर्न: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे. बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्यादिवशी डेविड वॉर्नरने शानदार डबल सेंच्युरी झळकवली. त्याच्या डबल सेंच्युरीवर स्टेडियममध्ये टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला. आनंदाच्या या क्षणात वॉर्नरची पत्नी कँडिसच्या डोळ्यात अश्रू होते. ती प्रचंड भावनिक झाली होती. मागच्या काही काळापासून वॉर्नरची खराब वेळ सुरु आहे. त्याची बॅट चालत नव्हती. त्यात क्रिकेट ऑस्ट्रेलियात त्याच्याविरोधात गेलं.

त्यांच्यासाठी ही जोरदार चपराक

डेविड वॉर्नरला निवृत्ती घेण्याचा सल्ला देण्यात आला. वॉर्नरवरील हा दबाव त्याच्या पत्नीला समजत होता. त्याच दरम्यान वॉर्नरने आपल्या आक्रमक स्टाइलमध्ये आज डबल सेंच्युरी झळकवली. 1089 दिवसानंतर वॉर्नरच्या बॅटमधून सेंच्युरी निघाली. वॉर्नर कुटुंबासाठी हे शतक खास आहे. कारण जे डेविडला निवृत्तीचा सल्ला देत होते, त्यांच्यासाठी ही जोरदार चपराक आहे.

डोळ्यात आनंदश्रू तरळले

वॉर्नरला सूर गवसल्याच पाहून प्रेक्षक स्टँडमध्ये बसलेल्या कँडिसच्या डोळ्यात आनंदश्रू तरळले. वॉर्नरही यावेळी भावूक झाला होता. त्याने डबल सेंच्युरीनंतर पत्नीला फ्लाइंग किस दिलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2018 साली सँडपेपर वादात तो फसला होता. त्यानंतर त्याच्यावर बंदी घालण्यात आली. त्याला कधीच ऑस्ट्रेलियाच नेतृत्व करता येणार नाही. कारण वॉर्नरच्या कॅप्टनशिपवर आजीवन बंदी घालण्यात आली. डेविड वॉर्नरने काय आरोप केला?

वॉर्नरच्या नेतृत्व करण्यावर आजीवन बंदी घालण्यात आली. या निर्णयाविरोधात त्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे अपील केलं होतं. पॅननला सर्वांसमक्ष माझा अनादर करायचा आहे, असं सांगून वॉर्नरने त्याचं अपील मागे घेतलं. त्याच्या कुटुंबाने बरच काही सहन केलय. वॉर्नरच्या या वक्तव्यानंतर त्याच्यात आणि बोर्डात सर्वकाही आलबेल नसल्याचं स्पष्ट झालं. त्यात त्याची बॅट चालत नव्हती, त्यामुळे क्रिकेट सोडण्याचा दबाव त्याच्यावर वाढत चालला होता.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.