AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona : क्रिकेट बोर्डाचं फिरलंय डोकं, कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूला प्लेइंग 11 मध्ये खेळवण्याचा निर्णय

कोरोना महामारीने जगात लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. कोराना नाव काढलं तरी पोटात गोळा आल्यासारखा होतो. तरीसुद्धा यातून क्रिकेट बोर्ड सुधारलेलं दिसत नाही. कोरोना असूनही खेळाडूली प्लेइंग 11 मध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Corona : क्रिकेट बोर्डाचं फिरलंय डोकं, कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूला प्लेइंग 11 मध्ये खेळवण्याचा निर्णय
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jan 25, 2024 | 12:37 PM
Share

मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंडमधील पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. इंग्लंड संघाने टॉस जिंकत झकास सुरूवात केली होती. मात्र दिग्गज स्पनिर आर. अश्विन याने दोन आणि जडेजाने एक विकेट घेत पाहुण्यांना पहिल्याचं सत्रात तीन धक्के दिलेत. टीम इंडिया आणि इंग्लंडमधील कसोटी सुरू असताना दुसरीकडेे वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियामध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या खेळाडूला प्लेइंग 11 मध्ये खेळवण्याचा धक्कादायक निर्णय टीम मॅनेजमेंटने घेतला आहे. कोण आहे तो खेळाडू जो कोरोना असताना सामना खेळत आहे.

स्टार खेळाडू कोरोनाग्रस्त

द गाबा या मैदानावर टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमधील दुसऱ्या कसोटी सामन्याआधी ऑल राऊंडर खेळाडू कॅमेरून ग्रीन याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे दुसऱ्या सामन्यामध्ये तो खेळणार नाही असंच वाटत होतं. मात्र दोन्ही संघ सामन्याआधी राष्ट्रगीतासाठी मैदानात उतरले तेव्हा कॅमेरून ग्रीनसुद्धा आला होता. राष्ट्रगीतासाठी मैदानात उतरलेला ग्रीन आपल्या संघापासून काहीसा दूर उभा राहिला. बाकी खेळाडूंना संसर्ग होऊ नये म्हणून त्याने काळजी घेतली.

सोशल मीडियावर ग्रीनचा फोटो जोरदार व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे. कोरोना म्हटलं तरी काळजात धस्स… होतं. पण ऑस्ट्रेलिया टीम मॅनेजमेंटने काय विचार करून असा निर्णय घेतलाय हे काही स्पष्ट केलं नाही. ग्रीन बाजूला उभा राहिला तरी फिल्डिंगवेळी बॉल तर पकडणारच. त्यामुळे इतर खेळाडूंसह विरोधी संघालाही धोका आहे.

दुसऱ्या कसोटीतील दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन:

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.

वेस्ट इंडिज (प्लेइंग इलेव्हन): क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), तेजनारिन चंदरपॉल, किर्क मॅकेन्झी, अॅलिक अथांजे, क्वाम हॉज, जस्टिन ग्रीव्हज, जोशुआ दा सिल्वा, केविन सिंक्लेअर, अल्झारी जोसेफ, केमार रोच, शमर जोसेफ.

Follow Us
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...