AUSW vs INDW : टीम इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट, ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विजयासह सेमी फायनलमध्ये

Australia Women vs India Women Match Result : टीम इंडियाने कर्णधार हरमनप्रीत कौर हीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियासमोर 171 धावांचं आव्हान ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान सुरक्षितपणे पूर्ण केलं.

AUSW vs INDW : टीम इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट, ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विजयासह सेमी फायनलमध्ये
AUSW vs INDW Richa Ghosh
Image Credit source: Getty Images
| Updated on: Jun 28, 2026 | 11:24 PM

ऑस्ट्रेलिया वुमन्स क्रिकेट टीमने ऐतिहासिक असा विजय मिळवत आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या पर्वातील (Icc Womens T20i World Cup 2026) उपांत्य फेरीत धडक दिली आहे. टीम इंडियाने लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये कर्णधार हरमनप्रीत कौर हीने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियासमोर 171 धावांचं आव्हान ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 1 ओव्हरआधी 6 विकेट्स राखून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने 19 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 172 रन्स धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने यासह वुमन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. ऑस्ट्रेलियाचा हा सलग आणि एकूण पाचवा विजय ठरला. ऑस्ट्रेलियाने यासह सेमी फायनलचं तिकीट मिळवलं. तर पराभवामुळे भारतातं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. तर ए ग्रुपमधून भारताच्या पराभवासह दक्षिण आफ्रिकेने सेमी फायनलचं तिकीट मिळवलं.

सामन्याचा धावता आढावा

भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतासाठी 4 फलंदाजांनी केलेल्या खेळीमुळे 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 170 धावांपर्यंत पोहचता आलं. भारतासाठी कर्णधार हरमनप्रीत कौर हीने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. हरमनप्रीतने 27 बॉलमध्ये 56 रन्स केल्या. उपकर्णधार स्मृती मंधाना हीने 38 धावांचं योगदान दिलं. तर शफाली वर्मा आणि जेमिमाह रॉड्रिग्स या दोघींनी प्रत्येकी 34-34 धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी कॅप्टन सोफी मॉलिनिक्स हीने 2 विकेट्स मिळवल्या.

ऑस्ट्रेलियाची बॅटिंग

ऑस्ट्रेलियाची ओपनर जॉर्जिया वॉल 4 धावा करुन बाद झाली. फोबी लिचफिल्ड आणि बेथ मुनी या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी 50 रन्सची पार्टनरशीप केली. फोबीने 24 आणि बेथने 22 रन्स केल्या. तर एलिसा पेरी आणि एश्ले गार्डनर या जोडीने गेम बदलला. या दोघींनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करुन ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित केला. मात्र एलिसा पेरी अखेरच्या क्षणी आऊट झाली. मात्र तोवर ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित झाला होता. एलिसाने सर्वाधिक 56 रन्स केल्या. तर एश्ले गार्डनर हीने जॉर्जिया वॉरहमसह ऑस्ट्रेलियाला विजयी केलं. एश्लेने 29 बॉलमध्ये नॉट आऊट 53 रन्स केल्या. तर जॉर्जियाने नाबाद 4 धावा केल्या. भारतासाठी श्री चरणी हीने 2 विकेट्स घेतल्या. तर रेणुका सिंह ठाकुर आणि दीप्ती शर्मा या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला.

Follow Us