AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUSW vs INDW Toss : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॅटिंगचा निर्णय, किती धावा करणार?

Australia Women vs India Women Toss and Playing 11 : वुमन्स टीम इंडियाने ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण कोण आहे.

AUSW vs INDW Toss : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॅटिंगचा निर्णय, किती धावा करणार?
AUSW vs INDW Toss and Playing 11Image Credit source: bcci women X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 28, 2026 | 8:35 PM
Share

आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 30व्या सामन्यात ए ग्रुपमधील ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील पाचवा आणि शेवटचा सामना आहे. सामन्याचं आयोजन हे लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे. वुमन्स टीम इंडियाची या मैदानात टी 20i सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार हरमनप्रीत कौर हीने फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे आता महिला ब्रिगेड कांगारुंसमोर किती धावांचं आव्हान ठेवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टीम इंडियाकडे शेवटची संधी

टीम इंडियासाठी उपांत्य फेरीच्या हिशोबाने हा सामना करो या मरो असा आहे. भारताने आतापर्यंत साखळी फेरीत खेळलेल्या 4 पैकी 3 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्ध कोणत्याही स्थितीत हा सामना जिंकावा लागणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढवण्यासाठी भारताला तगडं आव्हान ठेवावं लागणार आहे. त्यामुळे भारतीय फलंदाज आता 20 ओव्हरमध्ये किती धावा जोडण्यात यशस्वी ठरणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ऑस्ट्रेलिया टीम इंडियावर वरचढ

दरम्यान टी 20i क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया टीम इंडियावर वरचढ असल्याचं आकड्यांवरुन स्पष्ट होतं. उभयसंघात एकूण 38 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाने या 38 पैकी 27 सामने जिंकले आहेत. तर भारताला फक्त 9 सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध दहावा टी 20i सामना जिंकून उपांत्य फेरीतील तिकीट मिळवणार का? यासाठी निकालापर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.

वुमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मंधाना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, ऋचा घोष (विकेटीपर), दीप्ती शर्मा, राधा यादव, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर आणि क्रांती गौड.

ऑस्ट्रेलिया वुमन्स प्लेइंग ईलेव्हन : बेथ मूनी (विकेटकीपर), जॉर्जिया वॉल, फोबी लिचफील्ड, एलिस पेरी, ॲशले गार्डनर, जॉर्जिया वेअरहम, ॲनाबेल सदरलँड, निकोला केरी, सोफी मोलिनक्स (कर्णधार), किम गर्थ आणि लुसी हॅमिल्टन.

Follow Us
खासदार संजय राऊत यांच्याकडून राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप...
Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांच्याकडून राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले?
रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चावरून सुप्रिया सुळे नाराज? विश्वासात...
Rohit Pawar : रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चावरून सुप्रिया सुळे नाराज? विश्वासात घेतले नाही, पत्रकार परिषदेत फोटोही नव्हता- सूत्र
नागपुरात मोर्चाची तयारी, इकडे सरकारकडून बैठकीचं आमंत्रण; रोहित पवार...
Chandrashekhar Bawankule : नागपुरात मोर्चाची तयारी, इकडे सरकारकडून बैठकीचं आमंत्रण; रोहित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
रोहित पवारांची नागपुरात दोन तास गुप्त बैठक; ट्रॅक्टर मोर्चाआधी नेमकी
Rohit Pawar : रोहित पवारांची नागपुरात दोन तास गुप्त बैठक; ट्रॅक्टर मोर्चाआधी नेमकी काय रणनीती ठरली?
रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्य
Pune : रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्यावर 20 वर्षीय तरुणाला जीवदान
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं
Aditya Thackearay : आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं; नेमकं कारण काय?
शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह..
Shivsena : शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज युक्तिवाद
ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील...
Rohit Pawar Tractor Morcha : ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील चर्चांना पुन्हा उधाण
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!