AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Babar Azam : अरेरे! पाकिस्तानचा कर्णधार इंग्रजीत ‘ढ’, सोशल मीडियावर नेटिझन्सकडून खिल्ली, क्रिकेटप्रेमी बाबरच्या मदतीला

Babar Azam : बक्षीस वितरण समारंभात Babar Azamला काही प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा त्याची जीभ इथेच गडबडलेली दिसली. बाबरची इंग्रजी भाषेवरील कमकुवत पकड लक्षात घेता चाहत्यांना खिल्ली उडवली.

Babar Azam : अरेरे! पाकिस्तानचा कर्णधार इंग्रजीत 'ढ', सोशल मीडियावर नेटिझन्सकडून खिल्ली, क्रिकेटप्रेमी बाबरच्या मदतीला
पाकिस्तानचा कर्णधार इंग्रजीत 'ढ'Image Credit source: social
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Aug 20, 2022 | 9:47 AM
Share

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या (Pakistan) क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम याची (Babar Azam) इंग्रजीत (English) ‘ढ’ आहे. हे अगदी सर्वश्रूत आहे. त्याची भाषेवरील पकड कमकुवत असल्यानं त्याला अनेकदा टीकेचा सामना करावा लागतो. पण,  तुम्ही जेव्हा एका मोठ्या पदावर असतात. देशाचं प्रतिनिधित्व करतात. तेव्हा तुम्हाला जागतिक पातळीवरील भाषा तरी नीट आली पाहिजे. आता बाबरची इंग्रजी किती कच्ची आहे. ते सगळ्या जगाला माहीत आहे. याचे एक छोटेसे उदाहरणही अलीकडे पाहायला मिळाले. नेदरलँड्सला गेलेल्या पाकिस्तान आणि यजमान संघ यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना 18 ऑगस्ट रोजी हेजलरवेग स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तान संघाने 98 चेंडू शिल्लक असताना 7 विकेट्सने मोठा विजय मिळवला. प्रत्येक सामन्याप्रमाणे या सामन्यातही बाबरची बॅट चमकली आणि संघाच्या विजयात तारणहार ठरली. त्याने संघासाठी 87.69 च्या स्ट्राईक रेटने 65 चेंडूत 57 धावांची सुरेख अर्धशतकी खेळी खेळली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून सात उत्कृष्ट चौकार आले.

पाकिस्तानचा कर्णधार इंग्रजीत ‘ढ’

…इथेच बाबर गडबडला

सामना संपल्यानंतर बक्षीस वितरण समारंभात झाला. यावेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला काही प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा त्याची जीभ इथेच गडबडलेली दिसून आली. बाबरच्या इंग्रजी भाषेवरील कमकुवत आकलनामुळे चाहत्यांना खिल्ली उडवणारा विषय मिळाला आणि मग काय. सोशल मीडियावर बाबरवर टीका सुरू झाली. कुणी खिल्ली उडवली तर कुणी बाबरा टोलाही लगावलाय.

सोशल मीडियावर खिल्ली

क्रिकेटप्रेमी बाबरच्या मदतीला

बाबर हा पहिला पाकिस्तानी खेळाडू नाही ज्याला इंग्रजीत घट्ट पकड आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक, सर्फराज अहमद यांसारख्या खेळाडूंचाही या भाषेत हातखंडा आहे. त्यामुळे त्याला सोशल मीडियावर चेष्टेचा विषयही बनवावा लागला आहे. मात्र, काही भारतीय चाहत्यांसह जगभरातील क्रिकेटप्रेमी बाबरच्या मदतीला धावून आले आहेत आणि त्याला पाठिंबा देत आहेत.

बाबरला पाठिंबा

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नेदरलँड संघाने नाणेफेक जिंकून पाकिस्तान संघासमोर 44.1 षटकात 187 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य ग्रीन आर्मीने 33.4 षटकांत तीन गडी गमावून सहज गाठले. संघाकडून बाबर आझमशिवाय मोहम्मद रिझवानने नाबाद 69 आणि आगा सलमानने नाबाद 50 धावांची खेळी केली.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!