ODI World Cup साठी भारतात येण्यापूर्वी बाबर आझम याचा थेट आरोप, सर्वांसमोरच काढली उणीधुणी

| Updated on: Sep 26, 2023 | 4:11 PM

ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी दहा संघ सज्ज झाले आहे. स्पर्धा भारतात होणार असल्याने आशियाई संघांना जेतेपदासाठी पसंती दिली जात आहे. पाकिस्तानही दावेदार आहे. पण आशिया कपमधील पराभवानंतर टीमवर ताशेरे ओढले जात आहेत.

ODI World Cup साठी भारतात येण्यापूर्वी बाबर आझम याचा थेट आरोप, सर्वांसमोरच काढली उणीधुणी
ODI World Cup स्पर्धेसाठी भारतात पाऊल ठेवण्याआधीच बाबर आझम संतापला, मीडियासमोरच सर्वकाही बोलून टाकलं
Follow us on

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. यासाठी सर्वच संघ कसून सराव करत आहे. पाकिस्तानचा संघही भारतात सरावासाठी सज्ज झाला आहे. भारतात रवाना होण्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने पत्रकारांशी संवाद साधला. तसेच टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर देखील दिलं आहे. त्याने टीममधील वाद आणि वनडे वर्लडकप जेतेपदाबाबत थेट उत्तर दिलं. आशिया कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्तान संघावर चोहू बाजूने टीका होत आहे. तसेच संघात दोन गट पडले असून काही खेळाडू भिडल्याचं सांगितलं जात आहे. मात्र बाबर आझमनने या सर्व अफवा असल्याचं सांगत खंडन केलं आहे.

काय म्हणाला बाबर आझम?

बाबर आझम भारतात रवाना होण्यापूर्वी म्हणाला की, “मीडिया आमच्या विरोधात खोट्या चालवते. पाकिस्तानी खेळाडूंचं ड्रेसिंग रुममध्ये भांडणं झाली. पण असं काहीच झालं नाही. सर्व खेळाडू एका कुटुंबासारखे राहतात. एकमेकांवर प्रेम करतात. पराभवानंतर अशाच चर्चा होत असतात.” त्यानंतर बाबर आझम याला टीम वर्ल्डकप 2023 च्या टॉप 4 मध्ये एन्ट्री मारणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बाबर आझमने सडेतोड उत्तर दिलं.

“टॉप 4 तर खूपच खाली आहे. आम्ही तर एक नंबरच घेऊन येईल. कँप यासाठी नाही लावला गेला कारण आमच्याकडे आशिया कपनंतर फक्त एकाच आठवड्याचा अवधी होता. आम्ही दोन दिवस तीन महिन्यांपासून सलग क्रिकेट खेळत आहोत. -आता वर्ल्डकप सुरु होणार आहे. त्यासाठी आम्ही 7-8 दिवस प्रॅक्टिस करू आणि वॉर्मअप मॅचमध्ये आमची क्षमता दाखवून देऊ.”, असं पाकिस्तानचा बाबर आझम याने सांगितलं.

“माझ्या संघातील 15 खेळाडूंवर माझा विश्वास आहे. सर्वांचा विजयात मोलाचा वाटा आहे. प्रत्येक ठिकाणी टीम जिंकली आहे आणि नंबर वर विराजमान झाली आहे. मी पहिल्यांदा भारतात जात आहे. आशा आहे की मला भरभरून प्रेम मिळेल. पाकिस्तानी फॅन्सना त्या ठिकाणी मिस करू.”, असंही बाबर आझम याने पुढे सांगितलं.