AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ODI WC 2023: वर्ल्डकपमध्ये गोंधळ! सामना न खेळता दोन दिग्गज संघांना पाहावं लागलं होतं पराभवाचं तोंड

ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. वनडे वर्ल्डकप इतिहासात अनेक किस्से आहेत. यात त्या दोन सामन्यांचा उल्लेख कायम होतो. नेमकं काय झालं होतं ते वाचा...

ODI WC 2023: वर्ल्डकपमध्ये गोंधळ! सामना न खेळता दोन दिग्गज संघांना पाहावं लागलं होतं पराभवाचं तोंड
ODI WC 2023: वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा असाही इतिहास, दोन दिग्गज संघ सामना न खेळताच झाले होते पराभूत
| Updated on: Sep 25, 2023 | 9:50 PM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत दहा संघांचा सहभाग असून रॉबिन राउंड पद्धतीने साखळी फेरीचे सामने होणार आहेत. प्रत्येक संघ एकमेकांसोबत सामना करणार आहे. यापैकी टॉपला असलेल्या चार संघ उपांत्य फेरीत धडक मारणार आहेत. साखळी फेरीत एकूण 45 सामने होतील. त्यानंतर उपांत्य फेरीचे दोन आणि अंतिम फेरीचा एक सामना असे एकूण 48 सामने होतील. या स्पर्धेत जेतेपदासाठी काही संघांना पसंती दिली जात आहे. दुसरीकडे, वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या आठवणी जागा केल्या जात आहेत. वनडे फॉर्मेट पूर्वी 60 षटकांचा होता. त्यानंतर तो 50 षटकांचा झाला. त्यानंतर गेल्या वर्ल्डकप स्पर्धेत अंतिम फेरीत झालेल्या सुपर ओव्हर आणि धक्कादायक निर्णय सर्वांच्या लक्षात आहे. त्यामुळे 2023 मध्ये कोणता वाद डोकं वर काढेल सांगता येत नाही. दुसरीकडे 1996 मध्ये झालेल्या वर्ल्डकपची आठवण काढली जात आहे. कारण या सामन्यात दोन संघ सामना खेळताच पराभूत झाले होते.

श्रीलंकेला विजयी घोषित करण्याचं कारण काय?

वनडे वर्ल्डकप 1996 मध्यो दोन संघ सामना न खेळताच पराभूत झाले होते. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या संघांनी एक सामना खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर विरोधी संघांना विजयी घोषित केलं होतं. वनडे वर्ल्डकप 1996 मध्ये पाचवा सामना 17 फेब्रुवारीला श्रीलंका आणि ऑस्ट्रलिया यांच्यात होणार होता. पण हा सामना झाला नाही आणि श्रीलंकेला विजयी घोषित केलं.

वनडे वर्ल्डकप 1996 स्पर्धेतील 15 वा सामना वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात होणार होता. पण या सामन्यातही श्रीलंकेला सामना न खेळताच विजयी घोषित करण्यात आलं. पण नेमकं असं काय झालं होतं की श्रीलंकेला विजयी घोषित करण्यात आलं. चला जाणून घेऊयात या मागचं कारण..

श्रीलंकेच्या उत्तर भागात लिट्टे आणि लष्करात युद्ध सुरु होतं. यात 18 जुलै ते 25 जुलै 1996 दरम्यान काही ठिकाणी ब्लास्ट झाले. यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. सुरक्षेच्या कारणास्तव ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजने कोलंबोत खेळण्यास नकार दिला. त्यामुळे श्रीलंकेला विजयी घोषित करण्यात आलं.

1996 वर्ल्डकपचा अंतिम सामना श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला होता. श्रीलंकेनं अंतिम फेरीत जबरदस्त कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला मात दिली. तसेच वनडे वर्ल्डकपवर पहिल्यांदा नाव कोरलं. यावेळी श्रीलंकेचं कर्णधारपद अर्जुना रणतुंगा याच्याकडे होतं.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....